उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१० फेब्रुवारी, २००८

खाऊ नाही तर मरू

माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सरू
जिंकू किंवा मरू जिंकू किंवा मरू ॥ धृ॥

लढतिल सैनिक, लढू नागरिक
लढतिल महिला, लढतिल बालक
शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू ॥१॥

देश आमुचा शिवरायाचा,
झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू ॥२॥

शस्त्राघाता शस्त्रच उत्तर,
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू ॥३॥

शस्त्राघाता शस्त्रच उत्तर,
पिढ्या-पिढ्या हे चालो संगर
अंती विजयि ठरू, जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू ॥४॥

इतक चांगल गाण. त्याची अशी का वाजवावी? ती पण माझ्या सारख्याने ?
राम ! राम ! राम !



शरीराच्या त्या गरजेसाठी यज्ञकर्म ते करू
खाऊ नाही तर मरू,खाल्ल नाही तर मरू
खाऊ नाही तर मरू ॥ धृ॥

मरतील बक-या तसेच पक्षी
मरतील मछल्या,पडतील भक्षी
आम्ही सातत चरू, खाऊ नाही तर मरू ॥ १॥

देह आमुचा हाडमासांचा,
रक्त आणिक जिवपेशींचा
शक्तिवान तो करू, खाऊ नाहीतर मरू ॥२॥

भेकेचसाठी खाद्यच उत्तर,
जिव्हा न थांबे जरा तसूभर
पोट आपुले भरू, खाऊ नाही तर मरू ॥३॥

रोग होवो किती भयंकर,
पिठ्या पिठ्या तो चालो नंतर
आम्ही कशास डरू ,खाऊ नाही तर मरू
खाऊ नाही तर मरू ॥४॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा