उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१ एप्रिल, २०११

हार्दिक अभिनंदन

स्टार माझा’ हे ‘नव्या मराठी माणसाचं, नवं न्यूज टि.व्ही. चॅनल’. जगभरात पसरलेल्या याच मराठी मंडळींसाठी ‘ब्लॉग माझा’ स्पर्धा आयोजित केली गेली होती. अशी वैश्विक पातळीवरची स्पर्धा आयोजित केल्याबद्दल ‘स्टार माझा‘ ला आणि `स्टार माझा`चे प्रोड्युसर/अँकर प्रसन्न जोशी यांना मनापासून धन्यवाद.
हे या स्पर्धेचं तिसरं वर्ष. यात या वर्षी अनेक मराठी ब्लॉगर्सनी प्रवेशिका पाठवल्या होत्या. लेख,कथा, महाभारत, भटकंती, खवैय्येगिरी, वाचन, कविता, सामाजिक, राजकीय, आयटी....इ.विषयावरील वैविध्यपूर्ण लेखन असलेल्या असंख्य ब्लॉग प्रवेशिका आल्याचे कळले.
परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, सा. ‘साधना’) आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) यांनी उत्तम ब्लॉग निवडले. या दर्जेदार ब्लॉग्जची यादी येथे  आहे. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
या यादीत माझा 'उर्मी' ब्लॉग पाहून आनंद तर झालाच आणि माझ्या लेखनात अजून सुधारणा करण्याचे उत्तेजन मला नक्कीच मिळाले आहे.
सर्व विजेत्यांचे यश ‘स्टार माझा‘ या दूरदर्शन वाहिनीवर प्रक्षेपित करण्यासाठी चित्रण २६ डिसेंबर,२०१० रोजी स्टार न्यूज सेंटर, तळ मजला, फेमस स्टुडिओ शेजारी, डॉ. ई.मोझेस रोड, महालक्ष्मी मुंबई-११ येथे करण्यात आले.
या कौतुकाच्या दिवशी सर्व विजेत्यांना परिक्षकांच्या हस्ते बक्षीसे व उत्तेजनार्थ ब्लॉगर्सना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली. या स्पर्धेत ३६ ब्लॉगर्स विजेते ठरले. मात्र, कौतुक सोहळ्याच्या चित्रिकरणासाठी त्यातील २४ ब्लॉगर्सच उपस्थित राहिले.


त्या दिवशी मी भारतात हजर नसल्याने माझ्या आईने स्विकारलेले माझे प्रशस्तीपत्रक--



ह्या चित्रिकरणाचे  प्रक्षेपण रविवारी २७ मार्च,२०११ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत `स्टार माझा` ह्या दूरदर्शन वाहिनीवर झाले.

या स्पर्धेतील विजेते श्री गंगाधर मुटे यांच्या सौजन्याने हा सोहळा पुन्हा पुन्हा पहायची संधी मिळत आहे. त्यांना मनापासून धन्यवाद.
 बक्षिस वितरणाचा हा  सर्व कार्यक्रम त्यांच्या रानमोगरा   ब्लॉगवर  पहाता येईल.   सर्व विजेत्यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन.

४ टिप्पण्या:

  1. अशाच उठू दे अखंड ऊर्मी |
    असेच लेखन खुलू दे ||
    असेच मिळू दे पुरस्कार |
    अन्‌ बहर लेखना असू दे ||

    "उल्लेखनीय" ठरलेल्या ऊर्मींचे हार्दिक अभिनंदन!

    उत्तर द्याहटवा
  2. आपले मनापासून अभिनंदन.
    मराठी भाषा , मराठी विचार
    ताजेपणाने मांडता... आवडले


    subhashinamdar.blogspot.com

    उत्तर द्याहटवा
  3. "उर्मी" सुंदर ब्लॉग आहे.
    पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा