अंबे, ये व्याघ्रावर बसून
करी किणकिणती कंकणे, रत्नजडितांची भूषणे,
सोनसळी पैठणी नेसून; अंबे,ये व्याघ्रावर बसून
अंबे,ये व्याघ्रावर बसून. II१II
कूंकूम चिरी ही रेखिली, नथ साजिशी घातली,
बिजवरा भांग सळ भरून; अंबे,ये व्याघ्रावर बसून.
अंबे,ये व्याघ्रावर बसून.II२II
तू जगताची स्वामिनी, तूज वंदिती सूरवर मूनी,
सृष्टी न चाले तूज वाचून; अंबे,ये व्याघ्रावर बसून.
अंबे,ये व्याघ्रावर बसून.II३II
(एका भजनी मंडळात ऐकलेले `अंबेला आमंत्रण`)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा