उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

३ डिसेंबर, २०१३

नामचतुष्टय़

आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. तेथे विठ्ठलपंत कुळकर्णी आणि  यांची पत्नी रुक्मिणीबाई रहात होते. विठ्ठलपंत हे विरक्त संन्यासी होते. यांनी गृहस्थाश्रम त्यागून संन्यासाश्रमाचा स्वीकार केला होता. परंतु गुरूच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारलात्यानंतर या दांपत्याच्या पोटी  चार रत्न जन्मले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान मुक्ता.  ही चारही मुले म्हणजे महाराष्ट्राला लाभलेल्या तेजस्वी संतांची दिव्यमालेतील  तेजस्वी ग्रह  तारे आहेत असे म्हटले जाते.
ज्याप्रमाणे  वारक-यांचे विठ्ठलनामा वर प्रेम आहेतितकेच त्यांचे निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताईया नामचतुष्टय़ावरही प्रेम आहेआपल्य मुलांची  नावे अशी दिव्य भव्य ठेवणारे आई वाडिलही तितके  थोर आहेत यात शंका नाही.  
जिवनात सर्वात प्रथम हवी ती निवृत्ती. प्रंपच करताना निरासक्तीने  राहून परमार्थ साधवा. विरक्ती ही जिवनातील पहिली पायरी. त्यानंतर येते ते  ज्ञान . आपल्या अंतरा मधल्या  तसेच चराचरात वसलेल्या त्या परमेश्रराचे ज्ञान. आत्मज्ञान!  संस्कृत मधे सोपान म्हणजे  स्वर्गाकडे नेणारी शिडी. या शिडीने गाठायचा आहे तो केवळ स्वर्ग नव्हे तर मुक्तता. जन्म मृत्युच्या चक्रातून कायमची मुक्तता !  प्रपंचात निवृत्ती ठेऊन परमार्थ करताना आत्मज्ञानाच्या जाणिवेने जिवनात अध्यात्मिक शिडी चढून सर्वात वरची पायरी म्हणजे मोक्ष  गाठणे  हे मानवी जन्माचे ध्येय्य असावे.  प्रापंचिक जीवनातून निवृत्तहोऊन ज्ञानाचा सोपानचढत जीवन-मरणाच्या फे-यातून  मुक्त होणे म्हणजे जिवन.
या चतुष्टय़ाचा दुसरा अर्थ आहे की  चतुर्विध मुक्ती.
सलोकता (ज्या देवाची भक्ती करायची त्या देवाच्या लोकात रहायला मिळणे), समीपता म्हणजे (देवाच्या जवळ रहायला मिळणे), स्वरुपता(देवाच्या रूपासारखे रूप मिळणे), सायुजता (तेव्हा जीव व शिवाची ऐक्य होणे आणि त्या  देवातच विलीनता मिळणे)  या चारी मुक्त्या म्हणजे निवृत्ती,ज्ञानेश्वर,सोपान,मुक्ताई.
 श्री संत ज्ञानदेव आपल्या हरिपाठात म्हणतात , 
देवाचिया द्वारी उभा क्षणभरी तेणें मुक्ती चारी साधियेल्या 
 प्रापंचिक विषयापासून तसेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड विकारांपासून मुक्तता म्हणजे  विरक्ती किंवा निवृत्ती.
 ‘हे शरीर म्हणजेच मी आणि माझा आत्मा“ ह्या गैरसमजुतीपासून आणि अज्ञानापासून मुक्तता म्हणजे आत्मज्ञान.
अध्यात्मिक प्रगतीमधे काही अडथळे, खाच खळगे असतील तर त्यापासून मुक्तता म्हणजे वरच्या पायरीवर जायची शिडी किंवा मार्ग म्हणजेच सोपान
 आणि सर्वात शेवटी या आत्म्याची जन्म मृत्यूच्या फे-यातून सुटका होऊन त्या परमेश्ररात विलिन होणे म्हणजे खरी मुक्ती किंवा मोक्ष.
हरिपाठात हेच सांगितले आहे की देवासमोर मनापासून हात जोडून, देवाला शरण जाऊन एखादा क्षण जरी कोणी उभा रहिला तरी  चार ही प्रकरच्या मुक्ती  साधता येतात.   

1 टिप्पणी: