हा अमेरिकेतील जॉर्जिया
राज्याचा पक्षी आहे.
त्याच्या ब्राऊन पंखावर काळ्या पांढ-या ठिपक्यांच्या रेषा
असतात. मण्यांसारखे डोळे पिवळे असतात. पोटाकडील भाग पिवळसर पांढरा असतो. लांब
शेपटी असून मध्यम आकाराचा हा पक्षी झाडांच्या उंच शेंड्यांवर, झुडपांवर रहात असला
तरी हा मिश्रहारी पक्षी बहुतांश वेळ
जमिनिवरील छोटी फळे,बीया, तसेच लहान मोठे किडे,
इतर अन्न शोधताना दिसतो. अंडी उबवण्याच्या काळात
ब्राउन थ्रॅशर गवतातले किडे, तसेच फळे, बीया, दाणे खातात. उन्हाळा जवळ आला
की फळे ,बीया, दाणे, धान्य यावरच गुजराण
होते. हिवाळ्यात मात्र फळे, विशेषत: एकॉर्न खातात. त्यांच्या लांब बारीक चोचीने एकॉर्नची
कडक टरफले सहज फोडू शकतात. त्याच चोचीने ते जमिन, झुडपे चाचपून पाहतात. तेथिल जागा
साफ करून त्यात अन्न शोधायचा प्रयत्न करतात. त्यावेळी होणा-या आवाजावरून तसेच त्याच्या मोठ्या भक्श्याला खाण्यासाठी मारताना ते चोचीने प्रहार कारतात तेव्हा जो आवाज होते
त्यावरून थ्रॅशर हे नाव पडले असावे.
नर आणि मादी पक्षी एकत्रपणे काड्या गोळा करून
झुडपांमधे घरटी बांधतात आणि वर्षातून एकदाच अंडी देतात. ते रहात असलेल्या
ठिकाणानुसार अंडी देण्याचा काळ ठरतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा