अमेरिकेभर गेल्या महिनाभर फॉल फोस्टिव्हल सुरू होता. दुकानात भोपळ्याचा राशीच्या राशी विक्रीसाठी
मांडण्यात आल्या होत्या. त्याबरोबर त्याला
सुशोभित करण्यासाठी लागणा-या वस्तू, कोरण्यासाठी लागणारे चाकू, सु-या ह्या उपलबध
होत्या. घराच्या दाराजवळ ही कोरलेले, रंगवलेले, सजवलेले भोपळे दिसत होते. आज भोपळ्याच्या सणाचा शेवटचा दिवस म्हणजे
हॅलोविन. मी विविध भाज्या वापरून सजवलेला हा भोपळा --
या साठी वापरलेल्या भाज्या --
केस- चायनीज गवत
डोळे - सफेद कांदा
पापण्या- कांद्याचा बाहेरील पापुद्रा
भुवया - मटारच्या शेंगा
बुबुळ - काळा बटाटा
नाक - क्लेयोट
ओठ - लाल मिरची
कान- पिवळी मिरची
कानातले - चेरी टोमॅटो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा