टी किंवा चहा ज्याला मँडरिन चायनीज भाषेत `छा` `茶` म्हणतात, ते पेय चीनमध्ये`औषधी पेय` म्हणूनही प्यायले जाते.चीनमधील उत्तरेकडील भागात हवामान टोकाचे म्हणजे अति उष्ण किंवा अति थंड असते. तसेच हवेत आर्द्रता कमी. त्यामुळे शरीराला अधिकाधिक पाण्याचापुरवठा करण्यासाठी तेथील लोक सतत चायनीज टी पिताना दिसतात. पण भारतातसाखर, दूध घालून केलेला चहा, ज्याला बरेचदा `इंग्लिश टी` असेही म्हणतात,तो तिथे अपरिचितच.
चिनी लोकांचा `छा / 茶 ` म्हणजे आपल्याकडे असतो तसा काढा.तिथे अनेक प्रकारची सुकलेली पाने, फुल, बारीक फळे मिळतात. आपापल्या आवडीनुसार ती कपात घालायची व त्यात उकळलेले पाणी ओतायचे. पाणी शोषून जड झालेली पाने, फले, फुळे कपाच्या तळाशी जमतात व त्यांचा स्वाद असलेले जे पाणी वर राहते ते म्हणजे `चायनीज टी`. आपल्याकडे एकदा का चहा तयार झाला की, चहाचा चोथा फार तर एखादा वेळ वापरून टाकून दिला जातो. पण चायनीज टी मधील फुले-पाने पुनःपुन्हा गरम पाणी घालून दिवसभर वापरता येतात.
काही वेळा या सुकलेल्या फुलांच्या पाकळया व पानांच्या बारीक काडया पाण्यावर तरंगतात आणि चहा पिताना त्या तोंडात येण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी तिथे वेगवेगळया प्रकारचे थर्मास, कप, मग्ज मिळतात. थर्मासमध्ये वरच्या बाजूला बारीक जाळी असते. त्यामुळे चहा पिताना पाने, फुले गाळून पाणी ओतून घेता येते. थर्मासमध्ये पाणी अधिक काळ गरमही राहू शकते.
थर्मासची किंमत दर्जानुसार कमी-जास्त असते.
चिनी कपबश्या तर जगभरात प्रसिद्ध आहेत. काही चिनी मातीच्या कपांना धरण्यासाठी कान नसतात. हे कप व बश्या छोटयाशा असतात. या कपांवर असते छोटेसे झाकण. या झाकणामुळे कपातील चहा गरम राहायला मदत होते. तो पिताना हाताने कप उचलायचा, बोटांनी झाकण थोडेसे असे तिरके करायचे की बारीक पाने, पाकळया, काडया तोंडात येणार नाहीत. या कपाने चहा पिताना एक हातच पुरेसा व बशीचा वापर नुसता कप ठेवण्यासाठी. दोन्ही हातांनी उचलून बशीतील चहा भुरके मारून पिण्यासाठी नव्हे. तिथे काही `मॅजिकल मग्स` मिळतात. या मग्जवर आधी काळसर रंगाचे चित्र असते. त्या मगात गरम पाणी ओतले की, हळूहळू चित्र पालटत जाते व तेथे सुंदर रंगीत चित्र दिसायला लागते. मगातील पाणी थंड झाले की, पुन्हा पूर्वीचेच काळसर चित्र दिसते. काय जादू आहे काही कळत नाही. आकार, रंग, माप सर्वांत विविधता. जितका कप कमी जाडीचा, तेवढा तो वजनाने हलका, पण पैशाने मात्र जड. त्यावर सोनेरी रंग किंवा बारीक नक्षी म्हणजे अजूनच महाग. कपबश्यांबरोबर किटलीचेही अनेकविध प्रकार असतात. त्याबरोबरच serving tray मध्येही विविधता पाहायला मिळते. घराबाहेर पडतानाही लोक आवडी / ऋतूनुसार पाने, फले, फुळे थर्मास किंवा बाटलीत घेऊन बाहेर पडतात. अनेक प्रकारच्या घट्ट झाकणाच्या बाटल्या बरोबर नेण्यास सोयीस्कर असतात. गरम पाणी कुठेही व कधीही मिळणे सोपे. कारण कोप-या-कोप-यावर रेस्टॉरंट्स असतात व तेथे गरम पाणीही फुकट देण्यात येते. चीनच्या रेस्टॉरंट्समध्ये गेल्यावर टेबलवर पाण्याने भरलेले ग्लास न येता गरम चहाची किटली व कप समोर येतात. जेवणाबरोबर चायनीज टीच प्यायचा. चायनीज टी व फूड यांची संगती चांगली जमतेही! प्यायला साधे पाणी हवे असल्यास मिनरलच्या बाटल्या विकत घ्याव्या लागतात.
चीनच्या दक्षिणेकडेही चहा पिण्याची प्रथा आहे. पण गरम तापमानाच्या भागात वापरायची पाने, फुले अर्थातच वेगळी. ऋतुमानाप्रमाणे कोणता चहा प्यायचा ते ठरवायचे. कारण ते एक प्रकारचे टॉनिक आहे, तुम्हाला त्या त्यावातावरणात फिट ठेवणारे. थंड तापमानात गरम चहा म्हणजे शरीराची ऊर्जा वाढवणारे उत्तम इंधन. शिवाय थंडीमुळे होणारे सर्दी-पडसे/ खोकला यांना आवर घालणारा हा चहा त्वचा तजेलदार राखण्यासाठी अँटी एजिंग, तसेच फॅट रीड्युसिंग म्हणूनही अत्यंत गुणकारी आहे.
चीनमध्ये चहाचे इतके महत्त्व आहे की, चहा करणे व पिण्याचा एक `टी सेरेमनी`च असतो.
यात चहा करणा-या स्त्रीला अत्यंत आदराने वागवले जाते. कमरेत वाकून greet जाते. प्रथम उकळलेले पाणी सर्व भांडयांवर ओतले जाते. त्यामुळे भांडी निर्जंतुक, गरम होतात. नंतर हवातसा गरम चहा किटलीमध्ये करून मातीच्या बिनकामाच्या कपात दिला जातो. हा कप एखादा अक्रोड मावेल एवढा लहान आकाराचा असतो. एका वेळेस शरीरासाठी याप्रकारचा एवढाच चहा पुरेसा असतो. पिणा-याने हा चहा पिताना आभार मानायचे तर असतातच, पण पिऊन झाल्यावरही `छा हन् हाव` म्हणजे `फारच छान चहा` असे म्हणून अभिप्राय देण्याचा शिष्टाचारही पाळायचा असतो. लग्नकार्य, शुभप्रसंगात या `टी सेरेमनी`चा महत्त्वाचा भाग असतो.
चीनमधील लोक चहाच्या बाबतीत अतिशय चोखंदळ. त्यांचे हे चोचले पुरवणारी चहाची अनेक दुकाने व बाजार आहेत. बीजिंगमध्ये तर एका चहाच्या बाजारात शंभर चहाची दुकाने आहेत. त्यातील अनेक प्रकार व एकाच प्रकारच्या चहाचे अनेक नमुने पाहून चक्रावून जायला होते. अशा बाजारांमध्ये विविध चहाचे प्रकार दाखविले जातात. त्यांचा वास घेऊन ठरवायचे की, कुठच्या प्रकारचा वास तुम्हाला आवडेल. या चहाचे सॅम्पल छोटयाशा कागदी कपातून दिले जाते.या काढयासारख्या चहाच्या चवीपेक्षा वासाचेच महत्त्व अधिक. थोडक्यात`चायनीज टी` म्हणजे सुवासिक गरम पाणी.
चायनीज फूडप्रमाणेच या चायनीजटीची आवड झपाटयाने वाढत आहे. International Markets मध्येहीछा ची मागणी मोठया प्रमाणावर आहे. हा निर्यात होणारा चहा सुंदरशा डब्यात हवाबंद करून पाठवला जातो. कित्येक प्रवासी चीनमधून हा चहा आपल्या मित्र-मैत्रिणी/ नातेवाईकांसाठी भेट म्हणून घेऊन जातात.
असा हा चहा चीनमध्ये फारच लोकप्रिय, पण भारतात कुठेही असतात, तशा चहाच्या टप-या चीनमध्ये नाहीत. तो भरभरणारा स्टोव्ह किंवा गॅसही नाही.त्यावर आगीमुळे बाहेरून व चहामुळे आतून काळे झालेले भांडे नाही. हातावर थेंब थेंब टाकून चव चांगली झाली आहे की नाही, ते पाहणारा चहावाला, चहाची कळकट किटली हातात घेऊन फिरणारा अर्ध्या चड्डीतला पो-या तिथे पाहायला मिळत नाही. ती विजोड कपबशी पण थकलेल्या जिवाला पुन्हा उत्साहाने भरून काढणारा लालसर चहा. तोही अगदी एक-दोन रुपयांत तिथे मुळी नाहीच.
मग काय, टाकायची का एखादी भारतीय चहाची टपरी चीनमधील स्टेशन वा बसडेपो जवळ ?
(हा लेख ‘ई- सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)

चिनी कपबश्या तर जगभरात प्रसिद्ध आहेत. काही चिनी मातीच्या कपांना धरण्यासाठी कान नसतात. हे कप व बश्या छोटयाशा असतात. या कपांवर असते छोटेसे झाकण. या झाकणामुळे कपातील चहा गरम राहायला मदत होते. तो पिताना हाताने कप उचलायचा, बोटांनी झाकण थोडेसे असे तिरके करायचे की बारीक पाने, पाकळया, काडया तोंडात येणार नाहीत. या कपाने चहा पिताना एक हातच पुरेसा व बशीचा वापर नुसता कप ठेवण्यासाठी. दोन्ही हातांनी उचलून बशीतील चहा भुरके मारून पिण्यासाठी नव्हे. तिथे काही `मॅजिकल मग्स` मिळतात. या मग्जवर आधी काळसर रंगाचे चित्र असते. त्या मगात गरम पाणी ओतले की, हळूहळू चित्र पालटत जाते व तेथे सुंदर रंगीत चित्र दिसायला लागते. मगातील पाणी थंड झाले की, पुन्हा पूर्वीचेच काळसर चित्र दिसते. काय जादू आहे काही कळत नाही. आकार, रंग, माप सर्वांत विविधता. जितका कप कमी जाडीचा, तेवढा तो वजनाने हलका, पण पैशाने मात्र जड. त्यावर सोनेरी रंग किंवा बारीक नक्षी म्हणजे अजूनच महाग. कपबश्यांबरोबर किटलीचेही अनेकविध प्रकार असतात. त्याबरोबरच serving tray मध्येही विविधता पाहायला मिळते. घराबाहेर पडतानाही लोक आवडी / ऋतूनुसार पाने, फले, फुळे थर्मास किंवा बाटलीत घेऊन बाहेर पडतात. अनेक प्रकारच्या घट्ट झाकणाच्या बाटल्या बरोबर नेण्यास सोयीस्कर असतात. गरम पाणी कुठेही व कधीही मिळणे सोपे. कारण कोप-या-कोप-यावर रेस्टॉरंट्स असतात व तेथे गरम पाणीही फुकट देण्यात येते. चीनच्या रेस्टॉरंट्समध्ये गेल्यावर टेबलवर पाण्याने भरलेले ग्लास न येता गरम चहाची किटली व कप समोर येतात. जेवणाबरोबर चायनीज टीच प्यायचा. चायनीज टी व फूड यांची संगती चांगली जमतेही! प्यायला साधे पाणी हवे असल्यास मिनरलच्या बाटल्या विकत घ्याव्या लागतात.
चीनच्या दक्षिणेकडेही चहा पिण्याची प्रथा आहे. पण गरम तापमानाच्या भागात वापरायची पाने, फुले अर्थातच वेगळी. ऋतुमानाप्रमाणे कोणता चहा प्यायचा ते ठरवायचे. कारण ते एक प्रकारचे टॉनिक आहे, तुम्हाला त्या त्यावातावरणात फिट ठेवणारे. थंड तापमानात गरम चहा म्हणजे शरीराची ऊर्जा वाढवणारे उत्तम इंधन. शिवाय थंडीमुळे होणारे सर्दी-पडसे/ खोकला यांना आवर घालणारा हा चहा त्वचा तजेलदार राखण्यासाठी अँटी एजिंग, तसेच फॅट रीड्युसिंग म्हणूनही अत्यंत गुणकारी आहे.
चीनमध्ये चहाचे इतके महत्त्व आहे की, चहा करणे व पिण्याचा एक `टी सेरेमनी`च असतो.

चीनमधील लोक चहाच्या बाबतीत अतिशय चोखंदळ. त्यांचे हे चोचले पुरवणारी चहाची अनेक दुकाने व बाजार आहेत. बीजिंगमध्ये तर एका चहाच्या बाजारात शंभर चहाची दुकाने आहेत. त्यातील अनेक प्रकार व एकाच प्रकारच्या चहाचे अनेक नमुने पाहून चक्रावून जायला होते. अशा बाजारांमध्ये विविध चहाचे प्रकार दाखविले जातात. त्यांचा वास घेऊन ठरवायचे की, कुठच्या प्रकारचा वास तुम्हाला आवडेल. या चहाचे सॅम्पल छोटयाशा कागदी कपातून दिले जाते.या काढयासारख्या चहाच्या चवीपेक्षा वासाचेच महत्त्व अधिक. थोडक्यात`चायनीज टी` म्हणजे सुवासिक गरम पाणी.
चायनीज फूडप्रमाणेच या चायनीजटीची आवड झपाटयाने वाढत आहे. International Markets मध्येहीछा ची मागणी मोठया प्रमाणावर आहे. हा निर्यात होणारा चहा सुंदरशा डब्यात हवाबंद करून पाठवला जातो. कित्येक प्रवासी चीनमधून हा चहा आपल्या मित्र-मैत्रिणी/ नातेवाईकांसाठी भेट म्हणून घेऊन जातात.
असा हा चहा चीनमध्ये फारच लोकप्रिय, पण भारतात कुठेही असतात, तशा चहाच्या टप-या चीनमध्ये नाहीत. तो भरभरणारा स्टोव्ह किंवा गॅसही नाही.त्यावर आगीमुळे बाहेरून व चहामुळे आतून काळे झालेले भांडे नाही. हातावर थेंब थेंब टाकून चव चांगली झाली आहे की नाही, ते पाहणारा चहावाला, चहाची कळकट किटली हातात घेऊन फिरणारा अर्ध्या चड्डीतला पो-या तिथे पाहायला मिळत नाही. ती विजोड कपबशी पण थकलेल्या जिवाला पुन्हा उत्साहाने भरून काढणारा लालसर चहा. तोही अगदी एक-दोन रुपयांत तिथे मुळी नाहीच.
मग काय, टाकायची का एखादी भारतीय चहाची टपरी चीनमधील स्टेशन वा बसडेपो जवळ ?
(हा लेख ‘ई- सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा