उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

२२ जानेवारी, २००७

अनिवासियांचे ईंग्रजाळलेपण

अनिवासियांचे ईंग्रजाळलेपण हे शिर्षक पाहून कुणालाही वाटेल की हा टिकात्मक लेख आहे. पण नाही.अनिवासियांच्या ईंग्रजी भाषेचा अधिक वापर कसा स्वभाविक आहे हा दर्शवणारा हा लेख आहे.
ईंग्रजी ही आंतर राष्ट्रीय भाषा म्हणून सर्वमान्य आहे. ब्रिटिश आजवटीचा भारताला झालेल्या काही फायद्यांपैकी एक म्हणजे या इंगजी भाषेचे ज्ञान. यामुळे सुशिक्षित भारतीय जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी काहीतरी करून व्यवहार करू शकतों निदान अडून तरी राहत नाही. मुंबई, पुणे, बंगळोर सारख्या संमिश्र शहरात तर आपल्या जाती धर्माचा, आपली मातृभाषा बोलणारा सहकर्मचारी मिळण जरा कठिणच.सर्वसाधारणपणे वव्यवहार इंग्रजीतच होतात. त्यामुळे अगदी भारतीय निवासियांच्या बोलण्यातही अर्च इंग्रजी शब्द सहजी येतात. मग ते इंग्रजाळलेले नसतात का?
अगदी भांडी घासणारी बाईही आपल्या बोलण्यात साधे साधे इंग्रजी शब्द सहज वापरते. उदा: "आज त्या रोड वरच्या हापिसामदी कामात लई टाईम झाला. कंपनीने बील भरल नाई. लाईट गेली आन लिप्ट बंद पडली."
चार बुक ही न शिकलेल्या त्या अडाणीला टीव्ही, रोडिओ मुळे इंग्रजी भाषा काही अपरिचित राहिलेली नाही. लहान मुले इंग्रजी शाळेत जातात एव्हा त्यांचे शिक्षकांशी, मित्रमंडळींशी व्य्वहर इंगजीतच चालतात. श्रवण, भाषण या संबंधित कृती आहेत असे म्हणतात. घरी कमी वेळ घालवत असलेल्या या मुलांना मातॄभाषा तशी कमीच कानावर पडते. त्यांच्या आई वडिअलांना आपली भाषा शिअकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात."चिऊचे घरटे होते मेणाचे आणि काऊचे होते शेणाचे " असे ऐकलेल्या मुलाला शाळेत गेल्यावर `काऊ गिव्ज मिल्क`असे ऐकल्यावर सभाव्य गोंधळ टाळण्यासाठी पालकांना इंग्रजीतून बोलणेच फायदेशीर होते. त्यातून ते आई वडील जर भिन्न जाती/धर्माचे, भाषा बोलणारे असतील तर त्या कुटुंबाची भाषा भारतात काय आणि परदेशात काय. इंगजीच होते. मग त्यांनाही आपण इंग्रजाळलेले म्हणायला हवे.
पण भारताबाहेर र।हणा-याबद्दल बोलायच तर इंग्रजी भाषेशिवाय पर्याय नसतो. फ्रान्स, स्पेन, चीन ,रशिया, जपान, कोरिया यांसारख्या देशात तर त्यांच्याच भाषेची मक्तेदारी असते. त्या त्या ठिकाणी ती ती भाषा येत नसेल तर अर्थातच इंग्रजीचाच वापर करावा लागतो. सिंगापूर ,यु.ए.ई. यांसारख्या काही देशात हिंदीचा वापर होतो पण तो ही मर्यादित प्रमाणात.त्यामुळे परदेशात इंग्रजी भाषाच उपयोगी पडते हे खरे!
युरोप, अमेरिका ,कॅनडा यांसारख्या इंग्रजीचेच प्रभुत्व असलेल्या देशांमधे राहणारे भारतीय लोक ज्यांच्याबरोबर राहतात, वावरतात, काम करतात त्यांच्याबरोबर इंगजीतच बोलावे लागते. मल्टिनॅशनल कंपनीत काम करताना "हम हिंदी है, हिंदी मे ही बाते करेंगे " असे म्हणून चालणार नाही किंवा " जय महाराष्ट्र" म्हणून मराठीत संपर्क साधणे केवळ अशक्य.
काँप्युटरद्वारे होणारे संपर्क बहुधा इंग्रजीतच असतात. दिवसातल्या बारा तासापैकी आठ तास जर इंग्रजीचा वापर होत असेल तर दिवसातल्या उरलेल्या चार तासातील बोलण्यात इंग्रजी शब्द येणे स्वाभाविक नाही का?
शिवाय जिथे राहतो तेथील एंग्रजी बोलण्याच्या शैली (ऍक्सेंट)चा ही परिणाम होतो. एक मराठी माणूस जर दुस-या मराठी माणसाला भेटला तर मराठीत बोलावे यावत वाद नाही. आपल्या देशाच्या काय तर प्रांताचा, गावच्या माणसाबरोबर बोलताना परकीयांची भाषा जरूर टाळावी. पण उगाचच टेबलाला मेज आणि रेस्टॉरंटला विश्रामगृह म्हनून अतिरेक टाळावा. उलट मला असे सांगायचे आहे की ओढून ताणून लिखित भाषेतील शब्द वापरणेच टिंगलीचे विषय बनतात.
अनिवासियाचे ईंग्रजाळलेपण स्वाभाविक आहे. त्यांच्या तोंडात इंग्रजी सहज बसलेली असते. सतत इंग्रजी बोलल्या, वाचल्या, ऐकल्या, लिहिल्यामुळे साधे साधे इंग्रजी शब्द इतर भाषेतील शब्दांच्या आधी आठवतात असा अनुभव कित्येक परदेशी स्थित लोकांना आला असेल. अश्या वेळी बळे बळे लेखी भाषा बोलणे हास्यास्पद वाटते. संभाषणात बोलीभाषाच बरी वाटते --ऐकायला आणि बोलायलाही!
त्यामुळे बोलताना जर इंग्रजीचा वापर केल तर तो काही दयनीय ठरू नये.
Come on. It`s so obvious!


(  हा लेख इ सकाळ च्या पैलतीर मधे प्रकाशित झाला आहे.)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा