चिनी नवीन वर्षारंभ म्हणजेच चिनी लूनार नवीन वर्षारंभ. याला इंग्रजीमध्ये स्प्रिंग फेस्टिव्हल असे म्हणतात. पंधरा दिवस साजरा होणारा हा चिनी सण परंपरा आणि संस्कृती या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सण आहे. जगात कुठेही असलेला चिनी हा सण शक्य असेल त्या रीतीने साजरा करतोच. चिनी लूनार (चंद्राच्या स्थितीवर अवलंबित) कालगणातील पहिल्या महिन्याच्या अमावास्येच्या पुढल्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला हा चिनी नवीन वर्षारंभाचा सण सुरू होतो व संपतो तो पंधरा दिवसांनंतर येणा-या पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हा सण येतो तो जानेवारी शेवट किंवा फेब्रुवारी मध्यापर्यंत. २००७ या वर्षी चिनी वर्षारंभ आहे १८ फेब्रुवारीला.
चिनी कालगणतीत प्रत्येक वर्षाला एखाद्या प्राण्याचे नाव दिले गेले आहे. २००६ या (डॉग ईअर) कुत्र्याच्या वर्षाची जागा घेणारे हे नवीन वर्ष आहे (पिग ईयर) नर डुकराचे.
पारंपारिक रीतीप्रमाणे या सणाची तयारी सुरू होते ती कालगणतीतील आदल्या वर्षीच्या शेवटच्या म्हणजे बाराव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी. या दिवसाला सर्व घरांची, कामाच्या जागेची, कानाकोप-याची, दरवाजे, खिडक्यांची काळजीपूर्वक स्वच्छता केली जाते. नव्याचे स्वागत करण्यासाठी जुन्याला बाजूला करणे जरुरीचे. केरकचरा घराच्या मध्यावर गोळा करून तो घराच्या मागील दरवाज्याबाहेर नेऊन दूर टाकून दिला जातो.
चिनी समज आहे की नवीन वर्ष सद्भाग्य घेऊन येते. सणाची सुरवात झाली की त्या दिवशी केलेली साफसफाई हे सद्भाग्यही नाश करेल. म्हणून सर्व स्वच्छता सणाच्या आधीच केली जाते. जमल्यास घराची डागडुजी करून रंगरंगोटीही केली जाते. यात दरवाज्यांना साधारणपणे लाल रंगाचा वापर केला जातो. लाल रंगाचे गोल आकाशकंदील ही लावले जातात.`नियान' नावाच्या माणसे खाणा-या कथाकथित ड्रॅगनला घाबरवण्यासाठी लाल रंगाचा वापर करतात. दरवाजे, खिडक्यांवर लाल कागद कापून केलेले नक्षीकाम लावले जाते. सद्भाग्य, आनंद, धन, आरोग्य यांची अक्षरे चिकटवली जातात. घरात फ्लॉवरपॉटमध्ये छान फुले ठेवतात. प्रत्येक पारंपरिक चिनी घरात जिवंत बहरणारे रोपटे असतेच. पुनर्जन्म आणि नवीन वाढ असा त्याचा अर्थ होतो.
सणाच्या आधीचा दुसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे "लूनार' कालगणतीतील शेवटच्या म्हणजे बाराव्या महिन्यातील तेविसावा दिवस. हा दिवस म्हणजे (किचन गॉड) स्वयंपाकघराच्या देवतेचा. या दिवशी हा देव ताओ धर्मातील देवतांचा सम्राट `जेड देवता' याला सर्व कुटुंबीयांच्या मागील वर्षातील वर्तणुकीचा अहवाल देण्यासाठी स्वर्गात परततो असे मानतात. त्या दिवशी संध्याकाळी या स्वयंपाकघराच्या देवतेला निरोप देताना खूष करण्यासाठी गोडाधोडाची मेजवानीरूपी लाच दिली जाते. यात मुख्यत्वे कमळाच्या देठापासून बनवलेला गोड केक, लापशी, मध यासारखे चिकट पदार्थ अर्पण करतात. ज्यामुळे स्वर्गात गेल्यावर या देवतेचे तोंड बंद तरी राहील अथवा अहवाल दिलाच तर तो चांगलाच दिला जाईल.
उत्साही नवीन वर्षारंभाच्या सणाची इतर तयारी म्हणजे नवीन कपड्यांची, गिफ्ट्ची खरेदी. सारे वातावरण दिवाळीसारखे होते. दुकाने, मॉल्स माणसांच्या लोंढ्यांनी भरून जातात. ब-याच ठिकाणी "सेल'मुळे स्वस्त केलेल्या वस्तूंची विक्री अधिक होताना दिसते. या खरेदी-विक्रीबरोबर जुनी देणी देणे हेही महत्त्वाचे समजले जाते. ज्यामुळे नवीन वर्षाचा काळ कर्जरहित चांगला जाईल. इतर वेळी नियमबाह्य असलेली फटाक्यांची दुकाने या सणाच्या काळात मात्र रस्त्यांच्या कडेने दिमाखात लावलेली दिसतात. त्याशेजारी मुलांचा गलका तर उत्साह वाढवणारा असतो. शहरात आलेल्या गरीब कामकरी वर्गाला मात्र वर्षातून एकदाच लांब गावाला जायला शक्य होते. त्यांना आपल्या नातेवाईक, बायको, मुले, भाऊ, बहीण यांना भेटायचे वेध लागतात. हे लोक त्यांच्यासाठी शहरातून घेतलेल्या वस्तूंची बॅग खांद्यावर, डोक्यावर घेऊन प्रवासासाठी सज्ज होतात. लोक ट्रेन, बस जे वाहन मिळेल त्या वाहनाने प्रवास आपापल्या गावच्या घरी इतर कुटुंबीयांना भेटायला परतात. त्याच वेळी चीनमध्ये सर्वाधिक स्थलांतर होते. चिनी शाळा मात्र महिनाभर बंद असतात. या सणानिमित्त चीनमध्ये कार्यालयांना साधारणपणे एक आठवड्याची सुटी असते. बॅंकांनाही सार्वजनिक सुटी असते. काही लोक मौजेसाठी पर्यटनालाही बाहेर पडतात. या काळात विमान किंवा ट्रेनची तिकिटे मिळणे कठीण असते. आदल्या दिवशीपर्यंत सणाची तयारी, घाईगडबड चालू असते. घराची आवराआवर, स्वतःच्या नट्टा-पट्ट्याची, कपड्यांची तयारी यासाठी वेळ अपुरा पडतो. पुढील महत्त्वाच्या दिवसाच्या खाण्या-पिण्याची तयारी आधीच केली जाते. यामुळे चाकू, सुऱ्या, कात्री यासारख्या कापणीच्या धारदार वस्तू नवीन वर्षारंभाच्या सद्भाग्य घेऊन येणा-या दिवशी दूर ठेवता येतील. सणाच्या दिवसाची विभागणी स्वयंपाकघरातील काम आणि मौज अशी करावी लागू नये हा हेतू.
उत्साहाची भरभराट मुख्य सणाची सुरवात होते ती मध्यरात्रीपासूनच. फटाक्यांच्या आतषबाजीने नवीन वर्षाचे स्वागत होते. कानठळ्या बसवणा-या आवाजाची, अनेकविध रंगांची, सुंदर नक्षींची, आकाशातल्या लुकलुकणा-या तारका व चांदण्यांनाही हरवणा-या फटाक्यांच्या प्रकाशाची मजा सरकारने नेमून दिलेल्या वेळेत, नेमून दिलेल्या जागेतच लुटणे ही नागरिकांची जबाबदारी. पोलिसांना मात्र सणवार विसरावा लागतो. कारण जनतेची संरक्षण हे त्यांचे आद्यकर्तव्य. फटाक्यांच्या मजेबरोबरच पत्त्यांचे डाव, टी. व्ही.वरचे बहारदार कार्यक्रम यांचीही चंगळ असते. बहुतरंगी मेजवानीची तर काय बात सांगावी? या न्यू ईयर ईव्हच्या फॅमिली रियुनियन डिनरला गोड्या पाण्यातला कार्प मासा हे वैशिष्ट्य असते. कारण तो मासा म्हणजे फायदेशीर वर्षाचे प्रतीक आहे. मासा संपूर्ण न संपविण्याची पद्धत आहे. कुटुंबाला दुप्पट सौख्य लाभावे म्हणून जेवणाकरता ठेवलेल्या पदार्थांची संख्या सम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. या रात्री घरातील प्रत्येक दिवा पेटता ठेवला जातो. लोकांची उत्साह अगदी शिगेला पोचतो.
सणाचा पहिला दिवस सर्वांत महत्त्वाचा.
या दिवशी गुड लक घरात येते. यामुळे साफसफाई केली जात नाही. झाडू, कुंचा, सफाईची फडकी आणि इतर साहित्य दूर ठेवले जाते. हा दिवस आहे तो स्वर्गातल्या, जमिनीवरच्या देवदेवतांना आमंत्रण देणारा व त्याचे स्वागत करणारा. लाल रंग अग्नीचा. यामुळे दुष्ट शक्ती दूर राहते असे समजले जाते. म्हणून या दिवशी सर्व कुटुंबीय लाल भडक नवीन कपडे घालतात व नवीन वर्षाचे स्वागत करतात. या दिवशी सर्व कुटुंबीय एकत्र जमतात. सकाळी लहान मुले मोठ्यांना अभिवादन करतात. मोठी वृद्ध मंडळी लहान मुलांना, अविवाहितांना लाल पाकिटातून पैसे भेट देतात. अशी भेट देणे देणा-याला व घेणा-याला लाभदायक ठरते असे समजले जाते. परंपरेनुसार या दिवशी सकाळी मांसाहार वर्ज्य असतो. याचे दोन हेतू. पुढील मेजवानीसाठी पोटाची तयारी व हत्येचे पाप न केल्यामुळे झालेल्या चांगल्या कर्माची मिळकत. या शाकाहारी जेवणात महत्त्वाचा पदार्थ असतो "जावज' नावाचे डंपलिंग्ज. शिवाय मशरूम, बांबू, मोड आलेली कडधान्ये, फळे ही असतात. या सकाळच्या जेवणानंतर लोक आपल्या नातेवाइकांकडे, शेजारी-पाजारी अभीष्टचिंतन करण्यास बाहेर पडतात. या दिवशी वाईट शब्द बोलण्यास बंदी आहे.
या दिवशी काहीही उसने घेऊ किंवा देऊ नये असे चिनी लोक मानतात. नकारात्मक विचार न बाळगण्याचा कटाक्ष पाळला जातो. जुन्या वर्षाची, वाईट काळाची आठवण टाळली जाते.
लहान मुलांचा काहीही चाळा सहन केला जातो. हट्ट पुरवला जातो व ते रडणार नाहीत याची काळजी घेतली जाते. कारण जो या दिवशी रडतो तो पुढील संपूर्ण वर्षभर रडतो असा समज आहे. या पंधरा दिवसांच्या सणाच्या प्रत्येक दिवसाला वेगळे वेगळे महत्त्व आहे.
सणाच्या दुस-या दिवशी कुटुंबीय एकत्रित जमून आपल्या मृत पूर्वजांचे, तसेच देवतांचे पूजन करतात. सर्वांत मोठ्या मेजवानीचा हा दिवस. नवीन धंदेवाईक आपल्या नवीन वर्षाच्या कामाची सुरवात छानसे जेवण देऊन करतात. यात चिकन, कोलंबी, ऑस्टर, बदक यांचा समावेश करतात. असे हे खर्चीक जेवण दिल्यामुळे उत्तम टीम स्पिरिट निर्माण होते व पुढील वर्षाच्या फायद्याची जणू खात्रीच पटते.
तिस-या / चवथ्या दिवशी विवाहित मुली आपल्या आई - वडिलांना भेटायला माहेरी जातात. ती नवविवाहित असेल तर तिचा पतीही काही गिफ्ट घेऊन बरोबर जातो. हा दिवस असतो जावयाच्या त्याच्या सासरच्या माणसांबद्दल आदर दर्शविण्याचा.
सणाच्या पाचव्या दिवशी सर्व जण धन देवतेचे व आपल्या घरी याच दिवशी परतणा-या स्वयंपाकघराच्या देवतेचे स्वागत करतात. याच दिवशी गॅसजवळ स्वयंपाकघराच्या या देवतेच्या नवीन प्रतिमा लावल्या जातात. या दिवशी कोणीही कुणाकडेही जाता येत नाही. घराबाहेर पडत नाही. दोघांनाही ते दुर्भाग्य आणतात असा चिनी समज आहे.
सहावा ते दहावा दिवस आपल्या स्वकीयांची, नातेवाइकांची, मित्र-मंडळींची भेट घेण्यासाठी मोकळे असतात. चिनी शिष्टाचारानुसार चीनी संत्री (मॅंडरिन ऑरेंजेस) किंवा फळे भेट म्हणून नेण्याची पद्धत आहे. या दिवसात धार्मिक लोक मंदिरांना मात्र अवश्य भेटी देतात.
सातव्या दिवशी शेतकरी मंडळी आपल्या उत्पादनाचे प्रदर्शन मांडतात. हे शेतकरी सात भाज्यांपासून केलेले पेय पितात. दीर्घायुष्यचे प्रतीक म्हणून न्यूडल्स व यशाचे प्रतीक म्हणून कच्चा मासाही खातात. हा दिवस म्हणजे नवजन्म साजरा करण्याचा. याला प्रत्येकाच्या वाढदिवसाचा दिवस मानतात. म्हणजेच अजून एका मेजवानीचा दिवस. यात रंगीत फिश सॅलेड हे महत्त्वाचे. सद्भाग्य, धनवृद्धी आणि प्रगती यांची सदिच्छा एकमेकांना केली जाते.
आठव्या दिवशी एकत्रित जमून मध्यरात्री तिआन गॉग या स्वर्गातल्या देवतेचं पूजन केले जाते.
ताओ धर्मातील देवतांचा सम्राट `जेड' देवतेला खास वस्तू अर्पण करण्याचा दिवस नववा. सणाचे दहा ते बारा हे दिवस नातेवाइकांच्या जेवणावळीत जातात.
यात अखंडत्वाचे प्रतीक म्हणून चिकन डोक्यापासून, शेपटीपर्यंत पायासकट पुढे केले जाते. नूडल्सही दीर्घायुष्य दाखवण्याकरता न कापता, न तोडता ठेवले जातात. सणाच्या निमित्ताने होणारे सर्व पारंपरिक पदार्थांचे उच्चार व अर्थ चिनी चित्रलिपीतील आनंद, दीर्घायुष्य, भाग्योदय, प्रगती या शब्दांशी मिळते जुळते आहेत. याच दिवसात गावातील मंदिराजवळील जत्रेला लोक जरूर भेटी देतात. नाच, गाणी, खाणे-पिणे, खेळ-खेळणी, रंगीबेरंगी शोभेच्या वस्तूची लयलूट पहायला मिळते ती इथेच!
पण सणाच्या तेराव्या दिवशी मात्र तांदळाची लापशी खाऊन पोटाला आराम दिला जातो.
चौदाव्या दिवशी पुढील दिवसाच्या आकाशकंदिलांच्या सणाची तायरी केली जाते.
सणाचा पंधरावा अखेरचा दिवस पौर्णिमेचा. या दिवसाला आकाशकंदिलांचा सण असे
ही म्हणतात. तोही उत्साहात साजरा करतात. या दिवशी विविधरंगी आकर्षक, नक्षीदार आकाशकंदील घरात तसेच घराबाहेर, मंदिरात लावले जातात. काहींवर रंगवलेले पक्षी दिसतात तर काहींवर फुले. काहींवर झोडिऍक साईन तर काहींवर बुद्धप्रतिमा. काही कंदिलांवर इतिहासातील काही घटना रंगवलेल्या दिसतात. लहान, थोर माणसे असे प्रकाशमान कंदील हातात घेऊन संपूर्ण चंद्राच्या प्रकाशात होणा-या मिरवणुकीसाठी घराबाहेर पडतात. काही ठिकाणी ड्रॅगन डान्स, लायन डान्स हे प्रमुख आकर्षण असते. नियान नावाच्या दुष्ट ड्रॅगनला दूर पळवून लावण्यासाठी मोठमोठ्याने ढोल, झांजा वाजवल्या जातात. या दिवशी एकसंधता व संपूर्णता याचे प्रतीक म्हणून चिकट भाताच्या गोल आकारातल्या गोळ्यात गोड सारण भरून केलेला पारंपरिक पदार्थ जरूर खाल्ला जातो. यामुळे कुटुंबातील सर्व मंडळी एकमेकांना चिकटून, धरून राहतील असे मानले जाते.
आज-कालच्या मॉडर्न जमान्यात ही परंपरा तंतोतंत पाळणे कठीण झाले आहे; पण जुनी पिढी मात्र रीती रिवाजात कसूर करत नाही. या सणाचे महत्त्व काही कमी झालेले दिसत नाही. कारण हा सण आहे सर्वांचा. मोठ्यांचा, लहानांचा. जुन्याची पाठवणी करून नावीन्याचा उत्साह भरणारा. निराशेला हद्दपार करून आशेचे किरण देणारा. सदिच्छेचा.
तुमच्या शहरात जर चायना टाउन असेल तर तिथे भेट द्या व पहा तिथे कसा काय सण साजरा होतो आहे ते. तिथल्या चिन्यांना जरूर म्हणा.... Xin Nian Kuai Le. त्याचा उच्चार होतो `शिन निआन ख्वय लं. ` म्हणजेच Happy New Year.
(हा लेख ‘ई-सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)
चिनी कालगणतीत प्रत्येक वर्षाला एखाद्या प्राण्याचे नाव दिले गेले आहे. २००६ या (डॉग ईअर) कुत्र्याच्या वर्षाची जागा घेणारे हे नवीन वर्ष आहे (पिग ईयर) नर डुकराचे.
पारंपारिक रीतीप्रमाणे या सणाची तयारी सुरू होते ती कालगणतीतील आदल्या वर्षीच्या शेवटच्या म्हणजे बाराव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी. या दिवसाला सर्व घरांची, कामाच्या जागेची, कानाकोप-याची, दरवाजे, खिडक्यांची काळजीपूर्वक स्वच्छता केली जाते. नव्याचे स्वागत करण्यासाठी जुन्याला बाजूला करणे जरुरीचे. केरकचरा घराच्या मध्यावर गोळा करून तो घराच्या मागील दरवाज्याबाहेर नेऊन दूर टाकून दिला जातो.

सणाच्या आधीचा दुसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे "लूनार' कालगणतीतील शेवटच्या म्हणजे बाराव्या महिन्यातील तेविसावा दिवस. हा दिवस म्हणजे (किचन गॉड) स्वयंपाकघराच्या देवतेचा. या दिवशी हा देव ताओ धर्मातील देवतांचा सम्राट `जेड देवता' याला सर्व कुटुंबीयांच्या मागील वर्षातील वर्तणुकीचा अहवाल देण्यासाठी स्वर्गात परततो असे मानतात. त्या दिवशी संध्याकाळी या स्वयंपाकघराच्या देवतेला निरोप देताना खूष करण्यासाठी गोडाधोडाची मेजवानीरूपी लाच दिली जाते. यात मुख्यत्वे कमळाच्या देठापासून बनवलेला गोड केक, लापशी, मध यासारखे चिकट पदार्थ अर्पण करतात. ज्यामुळे स्वर्गात गेल्यावर या देवतेचे तोंड बंद तरी राहील अथवा अहवाल दिलाच तर तो चांगलाच दिला जाईल.
उत्साही नवीन वर्षारंभाच्या सणाची इतर तयारी म्हणजे नवीन कपड्यांची, गिफ्ट्ची खरेदी. सारे वातावरण दिवाळीसारखे होते. दुकाने, मॉल्स माणसांच्या लोंढ्यांनी भरून जातात. ब-याच ठिकाणी "सेल'मुळे स्वस्त केलेल्या वस्तूंची विक्री अधिक होताना दिसते. या खरेदी-विक्रीबरोबर जुनी देणी देणे हेही महत्त्वाचे समजले जाते. ज्यामुळे नवीन वर्षाचा काळ कर्जरहित चांगला जाईल. इतर वेळी नियमबाह्य असलेली फटाक्यांची दुकाने या सणाच्या काळात मात्र रस्त्यांच्या कडेने दिमाखात लावलेली दिसतात. त्याशेजारी मुलांचा गलका तर उत्साह वाढवणारा असतो. शहरात आलेल्या गरीब कामकरी वर्गाला मात्र वर्षातून एकदाच लांब गावाला जायला शक्य होते. त्यांना आपल्या नातेवाईक, बायको, मुले, भाऊ, बहीण यांना भेटायचे वेध लागतात. हे लोक त्यांच्यासाठी शहरातून घेतलेल्या वस्तूंची बॅग खांद्यावर, डोक्यावर घेऊन प्रवासासाठी सज्ज होतात. लोक ट्रेन, बस जे वाहन मिळेल त्या वाहनाने प्रवास आपापल्या गावच्या घरी इतर कुटुंबीयांना भेटायला परतात. त्याच वेळी चीनमध्ये सर्वाधिक स्थलांतर होते. चिनी शाळा मात्र महिनाभर बंद असतात. या सणानिमित्त चीनमध्ये कार्यालयांना साधारणपणे एक आठवड्याची सुटी असते. बॅंकांनाही सार्वजनिक सुटी असते. काही लोक मौजेसाठी पर्यटनालाही बाहेर पडतात. या काळात विमान किंवा ट्रेनची तिकिटे मिळणे कठीण असते. आदल्या दिवशीपर्यंत सणाची तयारी, घाईगडबड चालू असते. घराची आवराआवर, स्वतःच्या नट्टा-पट्ट्याची, कपड्यांची तयारी यासाठी वेळ अपुरा पडतो. पुढील महत्त्वाच्या दिवसाच्या खाण्या-पिण्याची तयारी आधीच केली जाते. यामुळे चाकू, सुऱ्या, कात्री यासारख्या कापणीच्या धारदार वस्तू नवीन वर्षारंभाच्या सद्भाग्य घेऊन येणा-या दिवशी दूर ठेवता येतील. सणाच्या दिवसाची विभागणी स्वयंपाकघरातील काम आणि मौज अशी करावी लागू नये हा हेतू.
उत्साहाची भरभराट मुख्य सणाची सुरवात होते ती मध्यरात्रीपासूनच. फटाक्यांच्या आतषबाजीने नवीन वर्षाचे स्वागत होते. कानठळ्या बसवणा-या आवाजाची, अनेकविध रंगांची, सुंदर नक्षींची, आकाशातल्या लुकलुकणा-या तारका व चांदण्यांनाही हरवणा-या फटाक्यांच्या प्रकाशाची मजा सरकारने नेमून दिलेल्या वेळेत, नेमून दिलेल्या जागेतच लुटणे ही नागरिकांची जबाबदारी. पोलिसांना मात्र सणवार विसरावा लागतो. कारण जनतेची संरक्षण हे त्यांचे आद्यकर्तव्य. फटाक्यांच्या मजेबरोबरच पत्त्यांचे डाव, टी. व्ही.वरचे बहारदार कार्यक्रम यांचीही चंगळ असते. बहुतरंगी मेजवानीची तर काय बात सांगावी? या न्यू ईयर ईव्हच्या फॅमिली रियुनियन डिनरला गोड्या पाण्यातला कार्प मासा हे वैशिष्ट्य असते. कारण तो मासा म्हणजे फायदेशीर वर्षाचे प्रतीक आहे. मासा संपूर्ण न संपविण्याची पद्धत आहे. कुटुंबाला दुप्पट सौख्य लाभावे म्हणून जेवणाकरता ठेवलेल्या पदार्थांची संख्या सम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. या रात्री घरातील प्रत्येक दिवा पेटता ठेवला जातो. लोकांची उत्साह अगदी शिगेला पोचतो.
सणाचा पहिला दिवस सर्वांत महत्त्वाचा.

या दिवशी काहीही उसने घेऊ किंवा देऊ नये असे चिनी लोक मानतात. नकारात्मक विचार न बाळगण्याचा कटाक्ष पाळला जातो. जुन्या वर्षाची, वाईट काळाची आठवण टाळली जाते.

लहान मुलांचा काहीही चाळा सहन केला जातो. हट्ट पुरवला जातो व ते रडणार नाहीत याची काळजी घेतली जाते. कारण जो या दिवशी रडतो तो पुढील संपूर्ण वर्षभर रडतो असा समज आहे. या पंधरा दिवसांच्या सणाच्या प्रत्येक दिवसाला वेगळे वेगळे महत्त्व आहे.
सणाच्या दुस-या दिवशी कुटुंबीय एकत्रित जमून आपल्या मृत पूर्वजांचे, तसेच देवतांचे पूजन करतात. सर्वांत मोठ्या मेजवानीचा हा दिवस. नवीन धंदेवाईक आपल्या नवीन वर्षाच्या कामाची सुरवात छानसे जेवण देऊन करतात. यात चिकन, कोलंबी, ऑस्टर, बदक यांचा समावेश करतात. असे हे खर्चीक जेवण दिल्यामुळे उत्तम टीम स्पिरिट निर्माण होते व पुढील वर्षाच्या फायद्याची जणू खात्रीच पटते.
तिस-या / चवथ्या दिवशी विवाहित मुली आपल्या आई - वडिलांना भेटायला माहेरी जातात. ती नवविवाहित असेल तर तिचा पतीही काही गिफ्ट घेऊन बरोबर जातो. हा दिवस असतो जावयाच्या त्याच्या सासरच्या माणसांबद्दल आदर दर्शविण्याचा.
सणाच्या पाचव्या दिवशी सर्व जण धन देवतेचे व आपल्या घरी याच दिवशी परतणा-या स्वयंपाकघराच्या देवतेचे स्वागत करतात. याच दिवशी गॅसजवळ स्वयंपाकघराच्या या देवतेच्या नवीन प्रतिमा लावल्या जातात. या दिवशी कोणीही कुणाकडेही जाता येत नाही. घराबाहेर पडत नाही. दोघांनाही ते दुर्भाग्य आणतात असा चिनी समज आहे.

सहावा ते दहावा दिवस आपल्या स्वकीयांची, नातेवाइकांची, मित्र-मंडळींची भेट घेण्यासाठी मोकळे असतात. चिनी शिष्टाचारानुसार चीनी संत्री (मॅंडरिन ऑरेंजेस) किंवा फळे भेट म्हणून नेण्याची पद्धत आहे. या दिवसात धार्मिक लोक मंदिरांना मात्र अवश्य भेटी देतात.
सातव्या दिवशी शेतकरी मंडळी आपल्या उत्पादनाचे प्रदर्शन मांडतात. हे शेतकरी सात भाज्यांपासून केलेले पेय पितात. दीर्घायुष्यचे प्रतीक म्हणून न्यूडल्स व यशाचे प्रतीक म्हणून कच्चा मासाही खातात. हा दिवस म्हणजे नवजन्म साजरा करण्याचा. याला प्रत्येकाच्या वाढदिवसाचा दिवस मानतात. म्हणजेच अजून एका मेजवानीचा दिवस. यात रंगीत फिश सॅलेड हे महत्त्वाचे. सद्भाग्य, धनवृद्धी आणि प्रगती यांची सदिच्छा एकमेकांना केली जाते.
आठव्या दिवशी एकत्रित जमून मध्यरात्री तिआन गॉग या स्वर्गातल्या देवतेचं पूजन केले जाते.
ताओ धर्मातील देवतांचा सम्राट `जेड' देवतेला खास वस्तू अर्पण करण्याचा दिवस नववा. सणाचे दहा ते बारा हे दिवस नातेवाइकांच्या जेवणावळीत जातात.

पण सणाच्या तेराव्या दिवशी मात्र तांदळाची लापशी खाऊन पोटाला आराम दिला जातो.
चौदाव्या दिवशी पुढील दिवसाच्या आकाशकंदिलांच्या सणाची तायरी केली जाते.

ही म्हणतात. तोही उत्साहात साजरा करतात. या दिवशी विविधरंगी आकर्षक, नक्षीदार आकाशकंदील घरात तसेच घराबाहेर, मंदिरात लावले जातात. काहींवर रंगवलेले पक्षी दिसतात तर काहींवर फुले. काहींवर झोडिऍक साईन तर काहींवर बुद्धप्रतिमा. काही कंदिलांवर इतिहासातील काही घटना रंगवलेल्या दिसतात. लहान, थोर माणसे असे प्रकाशमान कंदील हातात घेऊन संपूर्ण चंद्राच्या प्रकाशात होणा-या मिरवणुकीसाठी घराबाहेर पडतात. काही ठिकाणी ड्रॅगन डान्स, लायन डान्स हे प्रमुख आकर्षण असते. नियान नावाच्या दुष्ट ड्रॅगनला दूर पळवून लावण्यासाठी मोठमोठ्याने ढोल, झांजा वाजवल्या जातात. या दिवशी एकसंधता व संपूर्णता याचे प्रतीक म्हणून चिकट भाताच्या गोल आकारातल्या गोळ्यात गोड सारण भरून केलेला पारंपरिक पदार्थ जरूर खाल्ला जातो. यामुळे कुटुंबातील सर्व मंडळी एकमेकांना चिकटून, धरून राहतील असे मानले जाते.
आज-कालच्या मॉडर्न जमान्यात ही परंपरा तंतोतंत पाळणे कठीण झाले आहे; पण जुनी पिढी मात्र रीती रिवाजात कसूर करत नाही. या सणाचे महत्त्व काही कमी झालेले दिसत नाही. कारण हा सण आहे सर्वांचा. मोठ्यांचा, लहानांचा. जुन्याची पाठवणी करून नावीन्याचा उत्साह भरणारा. निराशेला हद्दपार करून आशेचे किरण देणारा. सदिच्छेचा.
तुमच्या शहरात जर चायना टाउन असेल तर तिथे भेट द्या व पहा तिथे कसा काय सण साजरा होतो आहे ते. तिथल्या चिन्यांना जरूर म्हणा.... Xin Nian Kuai Le. त्याचा उच्चार होतो `शिन निआन ख्वय लं. ` म्हणजेच Happy New Year.
(हा लेख ‘ई-सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा