जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी "मेड इन चायना' लेबल लावलेल्या वस्तू सर्रास पाहायला मिळतात. अमेरिकेतील मोठमोठाली शहरं काय, की भारतातील छोटंसं गाव काय? भाजी - आमटीतल्या लसणापासून ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत चायनीज स्वस्त माल सर्वांनाच माहीत आहे.
पूर्वेतिहास असलेल्या देशांकडे पूर्वापार चालत आलेली ज्ञानसंपदा तसेच अनुभवाचा बराच साठा असतो. हजारो वर्षांपासून स्थिरावलेल्या चीनकडेही खूप पारंपरिक कला आहेत. लोकरीचे विणकाम, मातीकाम, चित्रकला, भरतकाम, हस्तकला, लाकडी किंवा दगडी कोरीव काम चिनी लोकांना अवगत आहे. नानाविध रंगसंगतींच्या छान छान वस्तूंच्या निर्मितीची आवड आहे. पारंपरिक कलेची जोपासना, प्रगती करून त्याचा उपयोग अर्थार्जनासाठी केलेला दिसतो. यात गायन, वादनाबरोबर व्यायामाचे वेगवेगळे प्रकार (वुशु, कुंग-फु, ऍक्रोबॅटिक्स) तर जगप्रसिद्ध आहेत. चायनीज औषधे, जी वनस्पती, प्राणी, पक्षी यापासून केलेली असतात, त्यांचा गुण जलद व कायमस्वरूपी असल्यामुळे जगात त्यांचा प्रसार व मागणी वाढत आहे.वस्तूबरोबरच ज्ञानाचीही विक्री करण्यात चीन अग्रेसर आहे. योगविद्या मूळची भारतातील. ती शिकून घेऊन इंग्लंड, अमेरिकेत योग शिकवणारे चिनी योगशिक्षक ऐकिवात आहेत. फेंगशुई (आर्ट ऑफ प्लेसमेंट) या वस्तूंच्या रचनेच्या कलेचा वापर आपल्या समृद्धी व उत्कर्षासाठी करण्याचे फॅड भारतातही एवढे
सर्वत्र भेटणा-या या चिनी लोकांचे व्यक्तिमत्त्व प्रभावित करणारे असे म्हणाल तर तसं अजिबात नाही. खोल बारीक डोळे, नाक बसकट, गालाची सपाट हाडे, पिवळसर कातडी आणि यात अधिक भर म्हणून, की काय तर कमी उंची! मग जगातील सर्व बाजारपेठांवर आक्रमण करून यशस्वीरीत्या बस्तान मांडलेल्या या अशा चिन्यांमध्ये आहे तरी काय?
भौगोलिक दृष्टीने अतिप्रचंड असलेल्या या चीन देशात शेती करायला आणि औद्योगिकीकरणासाठी मुबलक जागा ही जमेची बाजू. जगात सर्वाधिक लोकसंख्या असल्यामुळे "मानव' एक उत्पादनाचा महत्त्वाचा घटक, याचीही काही कमी नाही. असंख्य कामगार उपलब्ध असल्यामुळे मजुरीचा दर कमी. माल तयार करण्याचा खर्च कमी. त्यामुळेच माल विकण्यासाठी जी किंमत आकारली जाते तीही तुलनेने कमीच. म्हणूनच या वस्तू चिन्यांना स्वस्त दरात विकता येतात. चिनी व्यापारी तसे विक्रीच्या शास्त्रात आणि कलेत चतुर आहेत.
चीनमध्ये स्थानिक मिळणा-या वस्तूंचा दर्जा व निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंचा दर्जा यात तफावत केली जाते. शिवाय प्रत्येक देशात जाणाऱ्या मालाच्या प्रकारात व दर्जात विषमता जाणवते. स्पष्ट करून सांगायचे म्हणजे चीनने अमेरिकेला पाठवलेला माल व भारतात पाठवलेला माल यांच्यात बराच फरक असतो. एकतर प्रत्येक देशातील लोकांच्या वस्तूंची गरज, आवड निरनिराळी. त्याप्रमाणेच लोकांची खरेदीची क्षमताही वेगळी. याच गोष्टी निर्यातीतील फरकाला कारणीभूत आहेत. उत्तम दर्जाची महागडी वस्तू कितीही सुंदर आणि उपयुक्त असली तरी भारतीय बाजारातून जलद विकली जाईलच अशी शक्यता कमी. म्हणूनच प्रत्येक देशाचा नीट अभ्यास करून त्या त्या प्रमाणे बदल करून वस्तू निर्यात करण्याचे "चातुर्य' चीनकडे आहे. "मागणीनुसार उत्पादन' हे समीकरण अचूक अवलंबले गेलेले दिसते.
जपानसारख्या नावीन्यपूर्ण वस्तूंचा शोध लावणा-या देशाकडून माहिती मिळवणे, त्यातील बारकावे समजून घेणे व त्याची चक्क नक्कल करणे यातही चीन मागे नाही. प्रतिकृती अशी तयार करतात की ती अगदी मूळचीच वाटावी.भौगोलिक दृष्टीने अतिप्रचंड असलेल्या या चीन देशात शेती करायला आणि औद्योगिकीकरणासाठी मुबलक जागा ही जमेची बाजू. जगात सर्वाधिक लोकसंख्या असल्यामुळे "मानव' एक उत्पादनाचा महत्त्वाचा घटक, याचीही काही कमी नाही. असंख्य कामगार उपलब्ध असल्यामुळे मजुरीचा दर कमी. माल तयार करण्याचा खर्च कमी. त्यामुळेच माल विकण्यासाठी जी किंमत आकारली जाते तीही तुलनेने कमीच. म्हणूनच या वस्तू चिन्यांना स्वस्त दरात विकता येतात. चिनी व्यापारी तसे विक्रीच्या शास्त्रात आणि कलेत चतुर आहेत.


पसरले आहे की आपले भारतीय वास्तुशास्त्र सोडून लोक या चिनी कलेच्या नादी लागले आहेत. "आपले' ते दुस-याच्या गळी उतरवण्यात तरबेज दिसतात हे चिनी.
प्रादेशिक भव्यता व अतिप्रचंड लोकसंख्या. त्यामुळे भिन्नता अपरिहार्य! पण चीनमधल्या विविधतेत ही एकात्मता दिसते. भाषा, पेहराव, अन्न यामध्ये वेगळेपणा असला तरी शेवटी सर्व जण चिनी! देशामधली हीच विविधता एक वैशिष्ट्य म्हणून चीनने जगासमोर मांडले आहे. जागतिक व्यवहारात प्रचंड परकीय चलन मिळवून देणारे पर्यटन (ट्रॅव्हल) क्षेत्रात चीन हे "प्रेक्षणीय स्थळ' म्हणून केव्हापासूनच उच्च स्थानावर जाऊन बसले आहे. दर वर्षी लाखो पर्यटक हा चीन पाहायला येतात आणि बॅगा भरभरून चिनी सामान आपल्या देशात घेऊन जातात.
चीनमध्ये धर्म, जात यांचा अतिरेक नाही. राजकारणात तर नाहीच नाही. ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व किंवा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हाणामा-या, दंगेधोपे झालेले ऐकले नाहीत. काही लोक तर कोणताही धर्म पाळत नाहीत. कुठल्याही येशू-अल्लाला न भजताही ते लोक मजेत रहात आहेत. हे सामाजिक स्वातंत्र्य व शांतता हे या देशाच्या प्रगतीला पोषकच आहेत.
सर्व चिन्यांकडे एक मात्र आहे - देशप्रेम! "मी एक चिनी आहे' हा सर्वांना अभिमान आहे. व्यापार, खेळ, युद्ध, अभ्यास किंवा इतर कुठलाही व्यवहार / उद्योग करताना आपल्या देशासाठी हानिकारक असे काहीही होणार नाही याची त्यांना सतत जाणीव असते. स्वतःच्या हित, प्रगतीइतकेच देशाचे हित आणि प्रगती महत्त्वाची. देशाचे राष्ट्रगीत उत्साहाने आणि अभिमानाने गाणारे हे चिनी देशप्रेमी हीच या देशाची खरी संपत्ती!
जागतिक व्यापारात वर्चस्व असणा-या चीन देशाच्या वर्चस्वाला चौकस, चाणाक्ष, स्नेहभावी, धूर्त, तडजोड स्वीकारणा-या व्यापा-यांबरोबरच चिनी सरकारही जबाबदार आहे. राजघराण्याची सत्ता संपुष्टात आल्यानंतर पूर्णपणे मोडकळीला आलेल्या देशाला पुन्हा उभे केले ते कम्युनिस्ट राजवटीने. आधुनिक सरकारनेही अंतर्गत राजकीय खेळी न खेळता, स्वहिताचे उद्दिष्ट गुंडाळून ठेवून जनहिताचे कार्य चालू ठेवले व देशाला सुस्थिती आणवली. बाजारपेठेच्या कक्षा सातासमुद्रापलीकडे रुंदावण्यासाठी लवचिक धोरण अवलंबून सवलतींद्वारे निर्यातीला प्रोत्साहन दिले. मुक्त व्यापाराला परवानगी दिली तरी स्वावलंबनाचा हेतू न विसरता! मल्टिनॅशनल कंपन्यांचा शिरकाव सहन केला तो केवल भांडवलासाठी नव्हे तर त्यांच्याकडून ज्ञान संपादन करता यावे म्हणून! आपला कुठलाही तोटा होणार नाही याचे पूर्णपणे भान चीन देशाला आहे.
कडक नियम, नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध कारवाई व त्वरित शिक्षा यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे सोपे झाले. सामाजिक, आर्थिक, राष्ट्रीय प्रगतीसाठी योजना केल्या. सरकारने व त्या अमलात आणण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले चिनी जनतेने आणि मग देशाला बळकटी आल्यावर एकजुटीने आक्रमण केले या जगावर. आक्रमण केले आहे इतर प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर, जी आहे देशाच्या पाठीचा कणा!
हे बहुरूपी सोंगी, ढोंगी आक्रमण वाळवीसारखे मुळापासून पोखरते आहे तुमचा देश. कधी लेचापेचा होऊन पडेल कळणार नाही तुम्हालाच.
म्हणून साऽऽ वऽऽ धाऽऽ नऽऽ!!!
(हा लेख ‘ई-सकाळ वृत्तपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)
(हा लेख ‘ई-सकाळ वृत्तपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा