भारतात कांजी हे मुख्य अन्न. त्यापासून बनविण्यात येणा-या वेगवेगळ्या पदार्थांची यादी तर न संपणारी होईल. त्यापैकीच एक साधासा पण प्रत्येकाला माहित असलेला पदार्थ म्हणजे कांजी.
चीन मधे आल्यावर या भाताच्या कांजीचे अनेक प्रकार खायला मिळाले.
ही कांजी आपल्याकडे उपासाला दूध घालून करतात. गोड साबुदाण्याच्या लापशीसारखी दिसते. फक्त त्यात साबुदाणा नसून तांदूळ वापरतात. तसेच त्यात दूध, साखर, मीठ काहीही नसते.
आपल्या आवडीनुसार साखर/मीठ घालून घ्यायचे. दिसायला साधीशी, करायला सोपी अशी कांजी चनीला मात्र विश्वास न ठेवण्याजोगी रूचकर असते. जास्त वेळ पाणी घालून खूप वेळ शिजवल्यास तयार होणारी कांजी जसजशी थंड होते तसतशी अधिकाधिक घट्ट होत जाते.

बिर्याणी, साखरभात, मसालेभात करत नसले तरी भाज्या तळून भातात एकत्र करून खातात. रेड बिन्स किंवा मुगाचे गोड सारण भातात भरून बांबूच्या पानात गुंडाळलेला सामोश्यासारख्या आकारात उकडलेला `जुंग ज्`--Zongzi नावाचा पदार्थ पक्वान्न म्हणून सणासुदीला खातात.
चीनमधे थोडा जाड,बुटका तांदूळ स्वस्तात मिळतो. उकड्या तांदळासारख्या दिसणा-या त्या तांदळाला वास नसला, तरी एक प्रकारचा स्वाद असतो. त्याचा भात चिकट होतो.असा ढिकळांचा भात चॉपस्टिकने सहज खाता येतो.
चीनी लोकांना पुलावासाठी उत्तम असलेले बासमती,कोलम वगैरे भारतीय प्रकार माहितही नाहीत. स्वाभाविकच आहे. कारण तो तांदूळ शिजवल्यावर भात मोकळा होतो. पण काड्यांनी एक एक शीत उचलून उचलून कोण खाणार?
एकदा पोट भरेपर्यंत पुन्हा जेवणाची वेळ होईल की !
(हा लेख ‘ई-सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)
(छायाचित्रे जालावरून साभार.)

लहान मुलांना खिमट देतात तश्या मऊ व सैल दाटसर कांजीमध्ये विविध भाजाही घालतात. बदकाचे मांस, चिकन, सी फूड यांमुळे मस्त स्वादाच्या वेगवेगळ्या कांज्या तयार होतात. लाल भोपळा घालून केलेली ऑरेंज कांजी, तर पालक घालून केलेली हिरवी कांजी. नाही तर नुसतीच भाताची पांढरी कांजी!
चीनमधे काळा तांदूळ ही मिळतो. त्याबरोबर शेंगदाणे, सुकी बोरं, सुकी कडधान्य याचीही सकस अशी कांजी तयार होते. कांजी सोबत मांस, मासे तसेच तळलेल्या भाज्या खातात.
उरल्या सुरल्या भाताचा उत्तम वापर म्हणजे कांजी. पोटभरीची पण पोटाला आराम देणारी कांजी अपचन व हिवाळ्यात होणा-या सर्दीवर योग्य उपचार. सहज गिळता येणारी ही कांजी केवळ आजारी माणसाचे अन्न आहे असे नव्हे.
ही पौष्टिक कांजी सकाळच्या न्याहारीला अथवा रोजच्या जेवणात सूप प्यायच्या चमच्याने सर्रास खाल्ली जाते.चीन मधे घरच्या जेवणात तेलकट प्राईड राईस फारसा खाल्ला जात नाही .चीनी लोक पुलाव,चीनमधे काळा तांदूळ ही मिळतो. त्याबरोबर शेंगदाणे, सुकी बोरं, सुकी कडधान्य याचीही सकस अशी कांजी तयार होते. कांजी सोबत मांस, मासे तसेच तळलेल्या भाज्या खातात.
उरल्या सुरल्या भाताचा उत्तम वापर म्हणजे कांजी. पोटभरीची पण पोटाला आराम देणारी कांजी अपचन व हिवाळ्यात होणा-या सर्दीवर योग्य उपचार. सहज गिळता येणारी ही कांजी केवळ आजारी माणसाचे अन्न आहे असे नव्हे.

चीनमधे थोडा जाड,बुटका तांदूळ स्वस्तात मिळतो. उकड्या तांदळासारख्या दिसणा-या त्या तांदळाला वास नसला, तरी एक प्रकारचा स्वाद असतो. त्याचा भात चिकट होतो.असा ढिकळांचा भात चॉपस्टिकने सहज खाता येतो.
चीनी लोकांना पुलावासाठी उत्तम असलेले बासमती,कोलम वगैरे भारतीय प्रकार माहितही नाहीत. स्वाभाविकच आहे. कारण तो तांदूळ शिजवल्यावर भात मोकळा होतो. पण काड्यांनी एक एक शीत उचलून उचलून कोण खाणार?
एकदा पोट भरेपर्यंत पुन्हा जेवणाची वेळ होईल की !
(हा लेख ‘ई-सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)
(छायाचित्रे जालावरून साभार.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा