
पोटात कावळे काव काव,
नकोस आणू उगीच आव.
मिळेल शहरी अन गावोगाव,
मस्त चव आणि स्वस्त भाव.
पावमिसळ कुणा नाही ठाव ?
मिसळ पाव, मिसळ पाव. II१II
पावाला थोडं बटर लाव.
उसळ, दाणे, टमाटर दाव,
लिंबाला मधेच घाल घाव,
जरासा रस मग त्यात श्राव.
शेवेखालचा कांदा खाव,
कोथिंबीरीला वर असेल वाव.II२II
वासाने पाणी तोंडाला याव,
पहाणा-याला फार सुटेल हाव,
खाणा-याची ती पोटात जाव,
मोठ्ठे घास, जरा हळ्ळूच चाव,
चवीने खा पण मार ताव,
असशील चोर अथवा साव.II३II
नसेल थारा ऐकताच नाव,
असो नसो भूक, घेतील धाव,
गरीब रंक अन राजा राव,
गरम मिसळ जशी उन्हात छाव,
मिसळपावाची असे अशीच माव,
मिसळ पाव, मिसळ पाव. II४II
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा