कालच परवाच सोनी टेलिव्हीजन वरचा Indian Idol हा कार्यक्रम पाहिला. पडद्यावर जे दाखवले गेले त्यावर लिहावस वाटलं. म्हणजे मी कार्यक्रमावर लिहिणार नाही. तर त्यात भाग घेणा-याबद्दल लिहिणार आहे. सध्या या कार्यक्रमात गायनाच्या स्पर्धेसाठी audition कशी केली गेली हे दाखवले आहे. म्हणजे सुरवातीची चाचणी आणि निवड फेरी! विविध रंग ढंग असलेल्या भारतात Indian Idol ची बस फिरून स्पर्धकांची निवड करताना दखवले आहे.
यातील काही निरीक्षण ---
सर्वच जागी इच्छुक गायकांच्या खूप मोठाल्या रांगा दिसल्या. तिथे किती वेळ जात असेल याचा सहज अंदाज बांधता येतो. मागे एकदा रात्री २ वाजता गवतावर गोलाकार बसून डब्बे उघडून खाताना काही तरूणांना पाहिले.शर्थ वाटली त्यांच्या चिकाटीची.
`बस! आज तो ऑडिशन देके ही जाएंगे` हा हट्ट जाणवला. त्या हट्टाची कमालही वाटली. मी तर एवढी रांग पाहून मागच्या मागेच पळ काढला असता.
दुसरे प्रकर्षाने जाणवले ते त्यांचा उत्साह. तरूणांत खूपदा स्पर्धांमधे भाग घ्यायला उत्साह दिसत नाही. काही वेळा अपयशाची तर कधी मित्रांकडून टिंगल होईल याची भिती वाटते. त्यामुळे कुठल्याही स्पर्धांमधे उतरण्याबद्दल तरूण उदासिन असतात. इथे Indian Idol टि. व्ही. शो मधे तर ओतू जाताना दिसला उत्साह. टि.व्ही. च्या आकर्षणाने आणि टी.व्ही.वर झळकायची जबरदस्त इच्छेने त्यांना तिथे खेचून आणलेले सहज जाणवले. हौशी आहेत बुवा सारे जण!
चाचंणीच्या आधी काही जण मैत्रीचा धागा जोडत एकमेकांना धीर देत होते. बरोबरीने स्पर्धा करण्या-याशी शत्रुत्व न बाळगता मैत्री केलेली ही आश्चर्यकारक वाटली. काही जण स्वतःहून ओढवून घेतलेले टेंशन घेऊन सुन्न बसले होते. अगदी अबोल,चलबिचल!
तिथे काही पालक, नातेवाईक आलेले पाहिले. त्यांनी दिलेला आधार, सहकार्य, प्रोत्साहन स्तुत्य वाटले. पण जास्त प्रशंसनीय वाटले ते स्वयंप्रेरित अश्या गायकांचे. बेधडक एकटेच निवड फेरीत येऊन थडकले होते.त्यांना कुणाच्या मदतीची उत्तेजनाची अपेक्षाच नव्हती. ब्राव्हो!
अजून एक लक्षात आले ते स्वतःच्या क्षमतेबद्दल अजाणतेपण. संगिताची आवड सर्वांना असते. गाण आवडत नसणारा माणूस शोधून काढणे कठिणच. निदान संगित ऐकायला तरी सर्वांनाच आवडत. परंतु सुरात गाता येण सर्वांनाच जमत नाही.
संपूर्णपणे सहमत!
पण गायन स्पर्धेत उतरत असताना आपल्या गाण्याच्या क्षमतेबाबत तरी पुरेपुर जाणिव असावी .
Indian Idol च्या निवड फेरीत तर गाता येत नसून ही Indian Idol बनण्याची स्वप्न पहाणा-या लोकांचे कौतुक करावी की कीव करावी ते कळत नाही. कौतुक वाटत कारण की आपल काम धाम सोडून तासनतास रांगेत तात्कळत उभे राहण्याची जिद्द, चिकाटी यांच्यात दिसली. आपली निवड होईल अशी आशा डोळ्यात जाणवली. त्या आशावादीपणाच, सकारात्मक विचारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. त्यांच्या स्पर्धात्मक स्वभावाची वाह वाह ही कराविशी वाटते.
काही बिचा-यांची कीव अश्यासाठी कराविशी वाटली की ब-याच जणांना आपल्यातल्या गुणांच्या कमदर्जेची जाण दिसली नाही. त्यांच्यात गायनाचा गुण आहे पण त्याचा दर्जा फार नीमप्रतीचा आहे हेच त्यांना कळले नाही. कदाचित ते आपला दर्जा पहाण्यासाठी ही आले असावेत.`बघुया, जमतं का एवढ्यावरच आपलं काही`, अशी स्वतःच्या नशिबाचीच चाचणी घेण्याची प्रवृत्ती वाटली.
आपल नशिब अजमावण्याला यांना हीच जागा मिळाली का? आणि असेल तर निदान आपल्या बद्दल किती ते गैरसमज? आपल्याला चांगले गाता येत नाही आणि आपली निवड होण्याची जराही शक्यता नाही हे या स्पर्धंकांना कळतच नाही का? बाथरूम सिंगर असूनही तिथे ऑडिशन देणे हे किती धारीष्ट्य? हिम्मतवान दिसले तिथे बरेच जण.
नुसत डेअरिंगच नाही तर स्वतःबद्दल आत्मविश्वास ही दिसला.
अणि त्या आत्मविश्वासाला पार तडा गेला, म्हणजे निवड झाल्याचे दाखवणारा पिवळा कागद मिळाला नाही तरीही बरेच जण खंबीर दिसले. ठिक आहे. काही हरकत नाही.`Better Luck Next Time` असा दृष्टिकोन ठेवून पुन्हा उमेदीने परतणारे पाहिले. त्यांच्या त्या उमेदीचे आश्चर्य वाटले. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे मानून बळकट मानाने हसत हसत बाहेर पडणा-यांना सलाम!
याच बरोबर स्वतःच्या स्वत:बद्दलच्या अपेक्षा अपु-या राहिल्यामुळे नाराज होऊन रडत रडत बाहेर येणारे कमकुवत स्पर्धकही पहायला मिळाले. एक शिवी हासडून बोलावेसे वाटले,"अरे गाढवा, तूला तूझी कुवत कळत नाही का? नसेल तर विचार कुणाला तरी .बिनधास्त कसा काय गेलास तिथे टिव्हीवर?"
परंतु त्याच्या तिथे जाण्याचही कौतुकच. कारण आपल नशिब अजमावयाचा सर्वांना सारखाच अधिकार असायला हवा. नाही का ?
निवड होणे न होणे हे थोडेसे तरी निशिबावर अवलंबून आहे.
आता असं पहा की ---इतके शेकड्याने, हजारोंनी स्पर्धक. त्यांना ऐकायचं आणि `हो` की `नाही` ठरवायचं हे किती वेळखाऊ काम असेल? ते तीन किंवा फार तर चार परिक्षक कंटाळत तर असतीलच. सुरावली ऐकायला मिळाली तर जरा तरी मौजमजा, आनंद. पण इथे तर अर्ध्याहून अधिक बेसुरेच!
त्यांच्यात समान सुरात गाणारे एकसारखे गायक कमित कमी दोन तरी सहज मिळतील त्या महासागरात! समान दर्जेचे असले तरी त्यापैकी एखाद्याची होईल निवड पण दुस-याची कदाचित नाही होणार. त्यामुळे निवड होणे न होणे हे मला नशिबावर अवलंबून वाटते. म्हणजे पूर्णपणे नसले तरी थोडेफार तरी असावे.
`By Chance निवड झाली तर झाली` अस मनात जाणून गाजराची पुंगी वाजवून पहाणा-याची काय चूक? गाजराची का होईना, निदान पूंगी वाजवण्याची कॄतीशीलता तरी दाखवली. अगदीच निष्क्रिय राहून दुस-यांना नाव ठेवण्यापेक्षा बरे !
सर्वात मनोरंजक होते ते काहींचे स्थलकालासाठी अयोग्य असे कपडे. म्हणजे ब-याच जणांना ड्रेसींगचा सेंन्सच नव्हता. ज्या नटाच्या तोंडचे गाणे म्हणायचे त्याचा सारखा गॉगल, टोपी, कपडे घालायची तिथे आवश्यकता नव्हती. काही जण तर लग्नाला जातात तसा पारंपारिक ड्रेस मधे आले होते तर काही जण थेट नवरदेवाच्या सुटाबुटात. त्यांची वेशभूषा आणि केशभूषा खूपच गमतीदार वाटली कारण ती प्रसंगानुरूप नव्हती.
त्या गाण्याच्या स्पर्धेच्या निवड फेरीत येऊन नाचाची कला दाखवण्या-यांनी तर पार धमाल उडवून दिली होती. त्यांच्या त्या मजेदारपणाचा अचंबा वाटला. दुस-यांनी टिंगल केली, हसले, हिणवले तरी यांना त्याची तमाच नव्हती. अगदि बेपर्वाईने किंवा अजाणता, न लाजता आपापली कला पेश करत होते. Hats of at them!
असो.
तर असे हे उत्साही, धाडसी, चिकाटी असलेले, जिद्दी, आशावादी, खंबीर, आत्मविश्वासू, कृतीशील, आत्मप्रेरित, बिनधास्त उमेदवार जरी गायक म्हणून निवडले गेले नसले तरी ह्या सर्व गुणांमुळे ते `मॉडेल` किंवा `आदर्श` (Idol) असेच आहेत. खरे की नाही?
(हा लेख ‘ई-सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा