असे हे जगाचे फिरे चक्र बाळा
हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा
हे गाणे ऐकत आणि म्हणत मोठे झालेल्या आपल्याला वाटतं की हे तीनच ऋतू संपूर्ण जगात आहेत. पण चीन देशात तीनपेक्षा आधिक आणि एकाच वेळी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे असे चार ऋतू अनुभवायला मिळाले.
चीन हा अवाढव्य पसरलेला देश. यामुळे चीनमधील सर्व ठिकाणी एकाच प्रकारचे हवामान अथवा ऋतू असणे शक्यच नाही. उत्तर चीनमधील बीजिंगमध्ये समर, ऑटम,विंटर आणि स्प्रिंग हे चार ऋतू स्पष्टपणे पाहायला मिळतात. समर अती गरमीचा तर विंटर अती थंडीचा ऋतू. ऑटम व स्प्रिंग हे कमी काळासाठी असले तरी सुखावह ऋतू होय.
समर ऋतूत बीजिंगला सकाळी ४ वाजता लख्ख उजाडते व संध्याकाळी साधारण ८ वाजेपर्यंत चांगला प्रकाश असतो. त्यामुळे दिवस मोठा असतो. दुपारचे तापमान ३५- ४० अंश सेल्सियसपर्यंत सहज पोचते. हवेतील कोरडेपणामुळे त्या कडक उन्हात बाहेर फिरणे जवळजवळ अशक्यच. आणि तरीही बाहेर फिरायला जायचा उत्साह असेल तर गॉगल,टोपी, छत्री याशिवाय जाणे मुश्किल. संध्याकाळी घराबाहेर किंवा बागेत खुर्च्या टाकून हातातल्या पंख्याने वारा घेत शीतपेये पीत बसलेले लोक पाहायला मिळतात. या ऋतूत शीतपेये किंवा पाण्याचे सेवन करून शरीराला आधिक पाणी पुरवठा करणे अत्यंत गरजेचे असते. नाहीतर गरमीच्या रोगांना तोंड द्यावे लागते. वातानुकुलित यंत्र आणि विजेचा खर्च सर्वांना न परवडण्याजोगा. त्यामुळे या दिवसात सिलिंग फॅन्सपेक्षा टेबल फॅन किंवा उंच स्टॅण्डवरच्या फॅन्सचा खप खूपच वाढतो हे सांगायलाच नको. `समर' ऋतू म्हणजे तरुण मुलींना तोकडे आणि स्वाभाविकपणे `हॉट` असे कपडे घालायला उत्तम कारण व संधी!
नंतर येतो ऑटम, ज्याला फॉलही म्हणतात. हा ऋतू म्हणजे पुढे येणा-या हिवाळ्याची चाहूल.
प्रीऑटम खरतर किती तरी मस्त वाटतो. बारिकशी थंडी हवी हवीशी वाटते. पण पण हिवाळ्याची चाहूल लागता क्षणी आधी पाखरांची चिवचिव बंद होऊ लागते.हिवाळ्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी बरीचशी झाडे आपापल्या फांद्यांतून सर्व रस आक्रसून घेतात व त्यांचा साठा आपल्या खोडामुळात करू लागतात.यामुळे झाडांची पाने आधी लालसर नंतर केशरी होऊ लागतात .सूर्यास्ताच्या वेळी सूर्य जसा आपल्या सर्वोत्कृष्ट अदा दाखवतो, तशीच ही पाने वेगवेगळा मेकप करून आपले सौंदर्य वाढवतात.विविध रंगसंगतीने आसमंत नटून उठतो.प्रत्येक झाडाच्या प्रकृती नुसार त्याच काही तरी वैशिष्ठ्य.त्याप्रमाणे त्याच्या पानगळीचा काळ. रंग आणि नाविन्य.प्रत्येक झाड आपले वेगळेपण प्रदर्शित करते.बघणा-यांच्या डोळ्यात ते ठसवायचा प्रामाणिक प्रयत्न करते.काही काळाने हीच पाने पिवळी पडून वा-याच्या एका लाटेसरशी जमिनीकडे धाव घेतात आणि मातीत मिसळतात. शेवटी उरतो तो फक्त काड्यांचा सांगाडा.झाडांची खोडही काळी पडतात.निळसर आकाशाच्या पृष्ठभागावर ही बरिक, जाड्या, सरळ, वक्राकार काड्यांची गडद नक्षी सुंदर दिसते. सर्व झाड मृतवत दिसत असली तरी त्यात पुन्हा जिवंत होण्याची जादू खोलवर ठासून भरली असते. निष्पर्ण होण्यास झाड तयार होतात कारण ही निसर्गासमोर मानलेली हार नसून निसर्गाशी केलेली तडजोड असते. तोच त्याचा अस्तित्वाचा पर्याय असतो.या ऋतूत रस्त्यांवर झाडू मारणा-या कामक-यांची संख्या वाढलेली दिसते. तेवढयाच जास्त नोक-या व गरिबांना रोजगार मिळतो.

विंटर किंवा हिवाळ्यामध्ये सूर्यदर्शनही बिकट होतं . भारतातील राजस्थानमधल्या वाळवंटातच काय पण दिल्ली, काश्मीरमध्ये रात्रीही एवढे कमी तापमान नसते, जेवढे बीजिंगमधील तापमानअसते. दुपारीही तापमान घसरते आणि रात्री तर -१७ ते -१८ अंश एवढे कमी होते. या थंडीत टोकदार सुईसारख्या पानांची झाडे तेवढी तग धरून राहतात व बाकीच्या झाडांच्या उरतात त्या फक्त काळ्या काडया. याच ऋतूत बारीक कापसासारखा बर्फ सर्व घरांवर, गाडयांवर, झाडांच्या काडयांवर, मैदानांवर भुरभुरला जातो. ते दृश्य एखाद्या चित्राप्रमाणे दिसते. सर्व बीजिंग पांढ-या रंगाने रंगवून नवीन स्वच्छ झाल्यासारखे वाटते. सूर्य बहुधा दिसतच नाही. त्यामुळे सूर्यास्त असा होतच नाही. अंधार दुपारीच ४.३० ते ५ वाजता होतो व सकाळी साधारणपणे ८ च्या सुमारास वातावरण उजेडाने लख्ख होतं. उबदार बिछान्यातून उठण्याची इच्छाच होत नाही मुळी. गरम कपडयांच्या ओझ्यासहित थंडी-वा-यात बाहेर फिरणेही नकोसे होते.हिवाळ्याच्या दिवसात त्वचा लवकर कोरडी पडते. त्वचा शुष्क आणि सुरकुतलेली दिसू लागते.विंटर केअर लोशन्स फॉर स्कीन, विटर जॅकेट्स्, ऊबदार शूज्, टोप्या, हाय मोजे पाय मोजे याच्या विक्रीत जणू चढाओढच लागते.
सर्वांना गारठवून अगदी नकोसा होऊन मग हिवाळा प्रस्थानास लागतो.सुरकुतलेल्या शुष्क हिवाळ्यातून वसंतऋतू पल्लवीत होतो. सशाची गोजरी पिल्लं घाबरत- बाचकत बिळातून डोकावून बाहेरच्या परिस्थितीचा जसा अंदाज घेतात, तशी झाडांची कोवळी पाने हळूहळू बाहेर डोकावू लागतात, ती स्प्रिंग ऋतूतच. सुंदर रंग आणि मंद सुगंध वसंतऋतूच्या आगमनाची वर्दी देत येतात.निष्पर्ण झाडांच्या सांगाड्यांतून कोवळी पाने डोकवायला लागतात. काही झाडांना पानं फुटता फुटायच्या आधीच फुलांचाही बहर येतो. जिकडेतिकडे नाजूक गुलाबी, पांढऱ्या, लाल फुलांनी डवरलेली झाडं दिसू लागली.
चेरीच्या झाडावर पानांच्या आधी फुलं बहरतात व एखाद्या काळ्या ठगाला चंदेरी किनार जशी उठून दिसते तसेच या पर्णरहित काळ्या फांद्यांवर लाल, गुलाबी, पांढरी चेरीची फुले आकर्षक दिसतात. स्प्रिंग मधला निसर्ग कोवळा , लहानग्या बाळासारखा निरागस वाटतो. रवीराजाही ढगांवर आरूढ होऊन आकाशात रोजच फेरफटका मारायला बाहेर पडतो.त्याची सर्वांवर कृपादृष्टी पडल्यामुळे वातावरण उल्हसित व चैतन्यपूर्ण होते. सर्व जीवनाची जणू नवी सुरुवात होते.
असे हे बीजिंगमधले चार ऋतू. प्रत्येकाचा स्पष्ट वेगळेपणा आहे, वेगळे सौंदर्य आहे. कलाकारांना हे ऋतू सतत खुणावतात. चिनी पेंटिंग्ज, कविता,कॅलेंडर्स, शोपीसेस इतकेच नव्हे तर लाकडी फर्निचरवरही ऋतुचित्रे पहायला मिळतात. टेलिफोन कार्डस् टुरिस्ट स्पॉटची तिकिटे यावरही त्या त्या ऋतूंची छायाचित्रं दिसतात. प्रत्येक ऋतूमधल्या कपडयांची, सणावारांची, जेवणाची त-हाही वेगवेगळी असते. ऋतुमानानुसार ती बदलते कारण मानव या ऋतूचक्रात तडजोड करता करता त्यातपुरता अङकतो आणि त्यातच खुषीने सामावून जातो.
(हा लेख ‘लोकसत्ता‘ वृतपत्रातील चतुरंग पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा