अमेरिकेत ३१ ऑक्टेबरला हॅलोविन हा सण साजरा केला जातो. कुठलीही अमानवी शक्ती मान्य करणारे / न करणारे लोक हा भुताचा सण साजरा करताना दिसतात. सणाच्या काही दिवस आधीपासून बाजारात हॅलोविनसाठी लागणारे सामान, कपडे, खाद्यपदार्थ लक्ष वेधून घेतात. दुकानांदुकानात विविध आकाराचे भोपळे दिसायला लागतात. मोठ्याल्या मॉलच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर तसेच आंत शिरताच लक्ष वेधून घेतील अशा रीतीने मांडून ठेवलेले दिसतात. भूताचे/चेटिकिणीचे मोठमोठे हलते पुतळे, हाडाचे सापळे, भयावह चेहरे व तुटके रक्तळलेले हात /डोळे, सुळीदार दातांची कवळी अशा वस्तू विकायला ठेवलेल्या असतात. अनेक लोक उत्साहाने त्या विकत घेतात.
सणाचा दिवस जवळ येतो तेव्हा घराच्या बाहेर भयावह आकृत्या दिसू लागतात. घराच्या दाराबाहेर खोट्या कवट्या,हाडे, सापळे, रक्ताळलेले मुखवटे, वटवाघूळ, कोळी किटकाची भयावह जाळी, भूताच्या/चेटकिणीच्या प्रतिमा यांची मांडणी दिसते. घराघराबाहेर अश्या भयानक प्रकारच्या सुशोभिकरणाची(?) चढाओढ लागते. अश्या घराबाहेरच्या मांडणीवर केलेल्या खर्चाचे आणि श्रमाचे कुतुहल आणि आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
अमेरिकेत भोपळ्याचे पीक चांगले घेतले जाते. हॅलोवीनच्या काळात ते तयारही होते आणि बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. घरोघरी दुकानातून खास भोपळे आणून ते विशेष चाकू/ सु-या कोरणी वापरून कोरले जातात. त्यावर चेहऱ्याप्रमाणे डोळे, नाक, तोंड कोरून त्या पोकळीत रात्री मेणबत्ती लावून घराच्या दारपाशी ठेवतात. त्याच बरोबरच लाल भोपळा कोरून केलेले रडके, हसरे, मजेशीर, वैतागलेले, कंटाळलेले, घाबरवणारे आणि घाबरलेले असे अनेक चेह-यांचे कंदिल दिसू लागतात. भोपळ्यांची मुंडकी जणू मानवी भावभावनाच व्यक्त करतात.
अमेरिकेत भोपळ्याचे पीक चांगले घेतले जाते. हॅलोवीनच्या काळात ते तयारही होते आणि बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. घरोघरी दुकानातून खास भोपळे आणून ते विशेष चाकू/ सु-या कोरणी वापरून कोरले जातात. त्यावर चेहऱ्याप्रमाणे डोळे, नाक, तोंड कोरून त्या पोकळीत रात्री मेणबत्ती लावून घराच्या दारपाशी ठेवतात. त्याच बरोबरच लाल भोपळा कोरून केलेले रडके, हसरे, मजेशीर, वैतागलेले, कंटाळलेले, घाबरवणारे आणि घाबरलेले असे अनेक चेह-यांचे कंदिल दिसू लागतात. भोपळ्यांची मुंडकी जणू मानवी भावभावनाच व्यक्त करतात.
शेकडो वर्षापासून अमेरिकेत भोपळ्याचा कंदिल jack-o-lantern करायची प्रथा पाळली जाते. या प्रथेचे मूळ आयरिश गोष्टीत मिळते.
या गोष्टीतील दारूड्या, कंजुष जॅकने एका राक्षसाला दारूपिण्यासाठी पबमधे बोलावलेले असते. काहीजण म्हणतात ती हॅलोविनची रात्र होती. खूप दारू पिऊन झाल्यावर पबमधे दारूचे पैसे देण्याची कंजुष जॅकची तयारी नव्हती. म्हणून तो राक्षसाला पैश्याच नाण व्हायची गळ घालतो. जेव्हा राक्षस आपल्या जादुई शक्तिने पैश्याच नाण बनतो तेव्हा जॅक ते नाण लगेचचच आपल्या पर्स मधील ख्रिस्ती क्रॉसच्या जवळ ठेऊन देतो. या क्रॉसमुळे राक्षसाची जादू निकामी होते आणि तो पुन्हा राक्षसी शरीर धारण करू शकत नाही. अनेक विनवण्यांनंतर जॅक राक्षसाला मोकळ करतो परंतु अट असते की पुढील दहा वर्ष जॅकला राक्षस काही त्रास देणार नाही आणि जॅकच्या शरीर किंवा आत्म्याची मागणी करणार नाही. दहा वर्षानंतर अचानक राक्षसला जॅक भटतो. तेव्हाही जॅक राक्षसला फसवतो. "मी यायला तयार आहे पण आधी मला या झाडावरचे सफरचंद काढून दे" अशी जॅक मागणी करतो. राक्षस झाडावर चढल्याबरोबर जॅक झाडाच्या बुध्यांवर ख्रिस्ती क्रॉस काढून राक्षसला त्या झाडावर अडकवून ठेवतो .काही काळानंतर जेव्हा हा जॅक मारतो तेव्हा या कंजुष, फसव्या जॅकला देव नगरी स्वर्गात प्रवेश नाकारला जातो. अप्रामाणिक जॅकला राक्षसी नरकातही घेतले जात नाही. "मी आता कुठे जाऊ?" अश्या जॅकच्या प्रश्नावर राक्षसांकडून उत्तर मिळते "जिथून आला आहेस इथे जा". वादळी वा-यात, मिट्ट काळोखात रस्ता शोधणे अशक्य असल्यामुळे जॅक दिव्याची मागणी करतो. आताही राक्षस मेहेरबानी करून जळता कोळसा जॅक कडे भिरकावतात. तो तसाच जळता ठेवण्यासाठी जॅक त्यावेळी खात असलेल्या भोपळ्यात तो कोळसा ठेऊन रस्ता शोधत निघतो. आजतागायत जॅकला प्रवेश देणारे जागा मिळाली नाही आहे. तो दारोदार हिंडतो आहे.
इथे तिथे भटकणा-या अवगुणी जॅकला आपल्या घरापासून हाकलवून देण्याच्या उद्देशाने आणि वाईट जॅकच्या अश्या या शिक्षेची आठवण करून देऊन योग्य वर्तणुकीची शिकवण देण्यासाठी भोपळ्यातले दिवे दाराबाहेर ठेवतात.
हॅलोविनला फॅन्सी ड्रेस घालून लहान मुल घोळका करतात. `ट्रीक ऑर ट्रीट`ला दरोदार हिंडून कँडीज गोळा करायला त्यांना काही औरच उत्साह असतो. घराघरातून हॅलोविन पार्टीज होतात. पार्टीच्या वेळी घरातले डेकोरेशन भितीदायक केले जाते. चित्र विचित्र आवाजाने लहान मुलांची तर भितीने गाळणच उडते. भयानक चेहरे रंगवून आणि कपडे घालून एकमेकांना घाबरवण्याची स्पर्धा लागते. हॅलोविनची थिम असलेल्या पाककृतीच्या पुस्तकांची चाळणी होते आणि मनुष्य प्राण्याच्या डोळ्यांना भयावह दिसणारे पदार्थ बनवतात. टरकी फू S S करणा-या गोष्टी सांगितल्या जातात. हॉरर मूव्हिज ही पाहतात. या सणाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण उत्साहात सहभागी होतात. घाबरत, घाबरवत का होईना पण सण जरूर साजरा करतात.
भूतं- खेतं, चेटकिणी यांची थिम असलेली पार्टी आपल्या भारतात तरी पाहिलेली नाही. मी पूर्णतः देसी असल्यामुळे हॅलोविन हा सणही मी देसी पध्दतीनेच साजरा करते. दुस-याला घाबरवण्याच्या भानगडीत न पडता मी स्वतःच न घाबरण्याची काळजी घेते. माझ्या आणि माझ्या कुटुबियांच्या रक्षणासाठी या दिवसात मी आमच्या घराच्या दारावर श्री हुनुमानाचा फोटो लावून टाकते आणि घरात निदान त्या दिवशी तरी रामरक्षा आणि हनुमान स्तोत्राचे पठण निश्चित होते.
हॅपी हॅलोविन!!
(काही छायाचित्रे जालावरून साभार.)
(काही छायाचित्रे जालावरून साभार.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा