' भोपळा ' हे नाव उच्चारताच समोर येतं ते गलेलढ्ढ शरीर. मग ते कुणाचही का असेना. वजनाचा काटा मोडणा-या बाईचं किंवा ढेरपोट्या माणसाचं किंवा डोक्यावर बुचडा बांधलेल्या जपानी रेस्टलरचं!
मला होते माझ्या मैत्रीणीची आठवण. कॉलेज मधे `चंद्र वाढतो कलेकलेने , XX वाढते किलो किलो` असा फिश पाँड मिळालेल्या त्या मैत्रीणीने वहीच्या शेवटच्या पानावर एक भोपळा काढून त्याला स्वतःचं नाव दिलं होतं. तिचं लग्न झालं ते ही एका जाड्याशी. काही वर्षांनी मी तिच्या घरी गेले तेव्हा तिने कुणालाही हसू आणेल अशी एक फ्रेम भिंतीवर लटकवली होती. त्यात एक मोठा, शेजारी त्यापेक्षा एक लहान आणि बाजूला दोन अगदी लहान पण जाड जूड अश्या चार भोपळ्यांचा एकत्रित फोटो लावला होता. फ्रेमवर सोनेरी रंगात कोरलं होतं --`हॅपी फॅमेली, स्विट फॅमेली`. आपल्या काबूत न राहिलेल्या तिच्या महाकाय शरीरात विनोदाचा गोडवा होता. वर वर अगदी हस्यास्पद दिसणा-या भोपळ्याच्या आतल्या गोडसर चवी सारखाच!

भोपळ्याच केवळ दृश्य स्वरूप पाहून भोपळा अजिबात न खाणारे लोक अनेक आहेत. त्यांना उडप्याकडे डोसा /इडली याबरोबर दिलेल्या सांबारातला ही भोपळा आवडत नाही. काहींना या भोपळ्यापासून केलेले अनेक पदार्थ जसे की रायत, गोड घारगे, वडे, खिर एवढच काय तर मेथीचे दाणे घालून तेलावर परतलेली लाल भोपळ्याची साधीशीच भाजी किंवा मूगाची डाळ घालून केलेली दूधी भोपळ्याची सुध्दा आवडते. दुधी भोपळ्याचा हलवा ,वड्या किंवा तांदळाची पिठी आणि जिरे पूड घालून केलेल्या दुधी भोपळ्याच्या नमकिन पु-याही अतिशय चविष्ट होतात. लाल भोपळ्याचे महत्व श्राध्दकार्यातही आहे. त्या दिवशी काही जातींमधे गवार आणि भोपळा याची एकत्र भाजी जरूर करतात.
मिश्र प्रतिसाद असलेल्या अश्या या भाजीने मराठी लेखनात काही विषेश जागा राखलेली आहे. उदा: `विळी- भोपळ्याचं नातं` हा शब्द समुह आपण अनेक कथा कादंब-यात वाचतो अणि प्रत्यक्ष जिवनात तर अनुभवतोच. ती विळी आणि तो भोपळा हे विरूध्द लिंगी असूनही त्यांच्यात अस नातं कसं काय हा प्रश्न पडतो. `ती` आणि `तो` यातली तसली टस्सल बरी. पण धारदार असली तरी सडपातळ विळीवर जाड सालीचा भला मोठा भोपळा चिरायचा म्हणजे महतकष्टप्राय! काही हुशार बायका "आमच्या घरी भोपळा कुणालाच आवडतच नाही " हे कारण पुढे करून भोपळा विकत आणायचं शिताफीने टाळतात म्हणेज मग तो भोपळा चिरायची भानगडच नको. पण याच बायका `चल रे भोपळ्या टुणुक टुणुक` गोष्ट आपल्या बाळाला अगदी रंगवून सांगतात. जन्मानंतर सर्वात आधी कुठली भाजी माहित होत असेल तर भोपळा. चावायला तोंडात एकही दात नसला तरी या लहान मुलांना टुणुक टुणुक चालणारा भोपळा पक्का माहित असतो. पुढे आपल्या मुलाला परीक्षेत मिळणारे भोपळे पाहिली की पालकांना आपल्या मुलाच्या हुशारीबद्दल असलेल्या भ्रमाचा भोपळा फुटल्याचा प्रत्यय येतो. हे मूल तरीही ज्यादा शहाणपणा दाखवत असेल तर त्याला `मडक्यात भोपळा भर, आणि हुशारी सिध्द कर` अस सांगायची वेळ येते.
लेखनातल तर सोडाच पण संगितामधेही महत्वाच स्थान या भोपळ्यापासून केलेला तानपुराच उचलतो. हे तानपुरा वाद्य भोपळ्यातला आतला गर, बिया काढून टाकून तो कडक उन्हात वाळवून बनवले जाते. तानपु-याची तार छेडल्यावर त्यातनं जो ध्वनी उमटतो तो पोकळ भोपळ्यात घुमतो आणि स्वराकार घेतलेला सुंदर आवाज ऐकू येतो. उत्तम गायकाला गाताना तानपु-यातून येणा-या केवळ `सा- प- सा` स्वरांचे ध्वनी पुरेसे होतात. तानपु-या व्यतिरिक्त इतर कुठल्याही वाद्याची जरूरी भासत नाही. तानपु-यातून येणा-या त्या मधुर स्वरांकरता हा जाडजूड गोलाकार भोपळाच लागतो. भोपळा सूकवून केलेले अजून एक वाद्य आहे ते म्हणेज नागपंचमीला दिसणा-या गारूड्याकडे असलेली पूंगी. काही आदिवासी जमाती या `बीन`चा वापर लोकसंगितात, नृत्यात करतात. या आदिवासी / भटक्या/ जंगली जमाती धातूपासून बनवलेल्या भांडी उपलब्ध नसल्यामुळे सुकट भोपळ्यापासून केलेली भांडी वापरतात. भगवी कफनी घालून दिसणा-या दाढीवाल्या साधू संतांच्या हातात दिसणार कमंडलू म्हणजे सुकलेला भोपळाच असतो.
कुठलीही वाद्य, भांडी किंवा कमंडलू तयार करताना त्याचा आकार अतिशय महत्वाचा. त्यामुळे मागणीप्रमाणे तश्या प्रकारचे हेतूपूर्वक उत्पादन करावे लागते. `घड्याएवढा जाड भोपळा, वेल तयाचा बोटभरी` असल्यामुळे या वेलींची विशेष काळजी घेऊन भोपळ्याची विशेष मशागत केली जाते.
चीनमधे ठराविक ठिकाणी दोरा/ तार /रबर बँड बांधून हवा तसा आकार देता येण्याची कला जोपासली गेली आहे. यातूनच मोल्डेड गोर्डसचे उत्पादन होते व त्याची जगभर मागणी आहे. सुकलेल्या भोपळ्यावर कोरिव काम, रंगकाम करून, मणी, मोती,धागे यांचा वापर करून अनेक विविध शोभिवंत वस्तूही तयार केल्या जातात. आपल्या भोवतालच्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी उपाय म्हणून `फेंग शुई` या चीनी वास्तूशास्त्रातही सुकलेल्या भोपळाचा वापर सांगितला जातो.
दक्षिण भारतात सुकलेल्या भोपळ्यापासून केलेले भयानक रंगित चेहरे घराच्या मुख्य दाराच्यावरच्या भिंतीवर लावतात. कुठल्याही शुभ प्रसंगी या दाराबाहेर भोपळा फोडायची प्रथा आहे. वाईट शक्तीच्या राक्षसाचं प्रतिक म्हणून ते फोडण्यात येत असावेत. मात्र तेव्हा सुकलेला भोपळा वापरत नाही.
पूर्वी सणासूदीला आयर्लंड आणि इंग्लंड येथे बीट, बटाटे कोरून यात दिवे ठेवत. या देशातून स्थलांतरीत झालेल्या लोकांनी ही प्रथा अमेरिकेत आणली. तेव्हा पासून अमेरिकेत भोपळ्यातले दिवे jack-o-lantern दाराबाहेर ठेवण्याची प्रथा अजूनही हॅलोविनच्या सणाला पाळली जाते.
हॅलोविनच्या पार्टीच्यावेळी सजावटीसाठी घरात विविध प्रकरचे `ओरनामेंटल गोर्ड्स` किंवा भोपळे ठेवले जातात. काही गोल तुळतुळीत्, तर काही फोड फोड असलेले खडबडीत.काही पिवळ्या डागांचे हिरवे तर काही हिरवे ओघळ गेलेले पिवळे, काही शेंदरी, काही पांढरे. काही उभट तर काही बसकट.
एरवी कुचेष्टा केल्या जाणा-या कुरूप भोपळ्यापासूनचे असे हे शोभिकरण आश्चर्यकारक वाटल्याशिवाय रहावत नाही.
या हॅलोविनच्या पार्टीत हॅलोविनची थिम असलेल्या लाल रंगाचे ब्लड सूप, स्पूकी आय बॉल्स, घोस्ट फेस पिझा, मॉन्स्टर कॉफिन केक, स्नेक एग कूकिज अश्या प्रकारच्या किळसवाण्या दिसणा-या पदार्थांबरोबर भोपळ्यापासून बनवलेले पंप्किन सूप, पंप्किन कूकिज, पंप्किन केक, पंप्किन रोल्स याची ही रेलचेल असते. याच दिवसात धंद्यातला वर्षभराचा तोटा भरून काढणारी भोपळ्यची विक्री होते आणि बागायतदार भोपळ्यावर खूष होऊन जातात. `घाण्याला बांधल्या बैलाला पोळ्याचा दिवस सोन्याचा` तसच काहीसं भोपळ्याचं हॅलोविनच्या काळात होऊन जातं.
अरे बापरे, हा लेख एवढा लांब लचक झाला? तो ही भोपळ्यावर?
आता मला सांगा `भोपळा` हा विषय काय लेख लिहिण्यासारखा आहे? पण भोपळ्याचं असतं ते हे अस्सं!
(हा लेख ‘लोकसत्ता‘ वृतपत्रातील चतुरंग पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा