उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

५ ऑक्टोबर, २०१०

कवितांचे अभिवाचन

सावळ्या कृष्णापाई वेड्यापिश्या झालेल्या बेछूट मनातील भावनांना सुंदर शब्दांचा साज अनुजा मुळे (झुंबर) यांनी ‘कृष्णपिसे‘ या कवितेत चढविला आहे.

आभाळ रीत होतंय आणि मोतीचूर सांडतय
तरारून धरा आलीये आणि काहूर उठतय..
                                   सावळभूल उठलीये कृष्णपीस लागलाय
                                   यमुनेच्या पुरापलीकडे मन वेड् धावतंय..
सरीबरोबरी भिजता भिजता सुरातही चिंब होतेय
लाघव त्याच्या बासरीच जीवघेण छळंतय..
                                   अशी ही निळी मेघभूल मला पुरती वेढतेय
                                 "इथेच आहे तो" भास असा सारखा देतेय..
चांदण्या शिवाय अवघं आकाश श्याममय झालंय
मलाच तो गवसेना पण आभाळ त्याने व्यापलय..
                                         वर्षेसारखी तुटून तुटून मीही मनभर ओसंड्तेय
                                कृष्णंगहिरे रूप साजिरे ठाई ठाई शोधतेय
आणि अचानक मला कसली चांदण मिठी पडली
आणि माझी ओळखा सगळी त्याच्यामध्ये विरली
                                            सापडला माझा कृष्णसखा अन मी मुरली झाले
                                                  आभाळ रिते होतच होते मी कृष्णं ओठातून सांडले.


याचेच अभिवाचन.....


ऋतूमानातील बदल हा तर निसर्गाचा नियम आहे. हा बदल हसतमुखाने स्विकारायला ही वसुधा म्हणजेच पृथ्वी सदैव तयार असते.
वसंत ऋतूला तर पृथ्वीने सखाच मानले आहे. त्याच्या भेटीसाठी ती आतुरली आहे. तिची ही ‘ओढ‘ व्यक्त करणारे हे विशाल कुलकर्णी यांचे काव्य.....

क्षणात हसले क्षणात रुजले,
वसंता तूझे गीत कोवळे..
दंवे सुखाने तृणही रमले,
कळ्यात हळवे भ्रमर गुंतले !

पानोपानी गंध दरवळे,
नाजूक इवली बकुळफूले..
गुलाब गाली ओज झळकले,
समीरानेही अंग झटकले !

रानीवनी जे फुल एकले,
त्यानेही मधु गीत गायले..
लाजत उभी निशिगंधा बोले,
मला सख्याचे वेड लागले !

हळुवार वसंता तूझी पाऊले,
व्याकुळ विरही तिने ऐकले,
वसुधेने मग बाहू पसरले,
भेटाया तुज मन ते धावले !



याचेच अभिवाचन.....




या दोन्ही कवितांचे अभिवाचन श्री. प्रमोद देव यांनी संपादित केलेल्या जालवाणी ध्वनीअंकासाठी केले आहे.
ही जालवाणी वाचायची ऐकायची असल्यास http://jaalavaani.blogspot.com/ येथे जरूर भेट द्या.

२ टिप्पण्या:

  1. अभिवाचन आवडले, विशेषत: "कृष्णपिसे"चे.

    उत्तर द्याहटवा
  2. सुरेख अभिवाचन! कृष्णपिसे अप्रतिम! कवितेतले सारे भाव अभिवाचनात आले आहेत.

    उत्तर द्याहटवा