तू आता आमच्यात नाहिस त्यावर केवळ दु:ख करणे एवढेच आमच्या हाती आहे. तूझे नृत्य नैपूण्य, हस्तकला,चित्रकला यांची आवड, नटण्या थटण्याची हौस आम्हाला कायमची लक्षात राहिल. तूझी दूस-यांना मदत करायची परोपकारी वृत्ती, किशोर आणि तरूणांनाही लाजवेल अशी कार्यशिलता आणि कमालिचा उत्साह प्रत्येक सणा-समारंभात आम्हाला तूझी आठवण करून देईल.
तू माझ्या लेखनाची एक प्रामाणिक वाचक होतीस. केवळ वाचकच नाही तरी माझ्या सामान्य अश्या लेखनाचे ही कौतुक करणारी आणि उत्तेजन देणारी होतीस. तू माझे सर्व लेख वाचायचीस. ते प्रिंट करून जवळ ठेवायचीस. पुन्हा पुन्हा वाचायचीस आणि कुणी आले गेले तर त्यांना ही आठवणीने देऊन आग्रहाने वाचायला लावायचीस. ह्या पेक्षा माझ्या सारख्या फुटकळ लेखिकेला काय हवे?
माझ्या ह्या उर्मी ब्लॉगवर तू कायमची राहशील आणि तूझ्या स्मृती नेहमीच जागृत राहतील. हीच माझी तुला श्रद्धांजली.
मी त्या ईश्वर चरणी प्रार्थना करते की तूझ्या आत्म्याला शांती मिळो तूझा मृत्योपश्चात प्रवास सुखकारी होवो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा