उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

५ सप्टेंबर, २००८

का असे केलेस?


कोप-या वरच्या दुकानात

एकदा येणे केलेस,

सर्व मूर्तींमधे मलाच

अचूक तू हेरलेस.


खिशातल्या पाकिटातून

लगेच पैसे काढलेस,

"नंतर घेऊन जातो"

हळूच मला सांगितलेस.


कागदी रंगीत मखरावर

छान दिवे सोडलेस,

लगबगीच्या तयारीला

उत्साहाने भरलेस.


चतुर्थीला मोटारीतून

मला घरी नेलेस.

जरीकिनारी आसानावर

स्थानापन्न केलेस.


पान,सुपारी,हार,तुरे

सर्व काही आणलेस.

भटाच्या सांगण्यानुसार

कसेबसे पुजलेस.


पेढे, मोदक, करंजी

खाऊ मला घातलेस.

नैवेद्याच्या लाचेमधे

नखशिकांत बुडवलेस.


टाळ्या, टाळ, झांजा वाजवून

कौतुक असे केलेस,

की भक्तिच्या देखाव्यात

सारे खरे भासवलेस.


का अशी पापे करून

सर्व काही गमावलेस?

"मला माफ कर"

नाही कधी म्ह्टलेस.


दुस-या दिवशी दुपारीच

पुन्हा एकदा ओवाळलेस,

उत्तर पूजा उरकून घेऊन

हलकेच मला हलवलेस.


"पुढल्या वर्षी लवकर या"

सांगून पाण्यात शिरवलेस,

स्वतःला धांदलीतून

लगेच मोकळे केलेस.


दिड दिवस का होईना,

तू मला आळवलेस,

जन्माचा राखणकर्ता म्हणून

मला कायमचे अडकवलेस.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा