फार पूर्वी मॅट्रिक परिक्षा झाली की गंगेत घोड नहायचं. मग कुठेतरी शिक्षकाची अथवा सरकारी नोकरी आणि नंतर विवाह करून गृह्स्थाश्रम सांभाळला जायचा. कलांतराने त्यापेक्षा जास्त शिक्षण घेणा-यांची संख्या वाढली.तालुक्याला/शहरात जाऊन एखादी पदवी मिळवणे हे अनेकांचं ध्येय्य झालं. काहींनी ते साध्य केलंही.पदवी संपादन करणे तेव्हा कौतुक करण्याजोगं होतं आणि ते अतिशय सन्माननीयही समजलं जायचं.
माझे बाबा पदवीधर झाले तेव्हा त्यांनी घराच्या दरवाज्यावरची पाटी नविन करून घेतली. बाबांचं नाव आणि खाली `बी .ए. ऑनर्स`. एवढंच नाही तर त्यांनी स्टुडिओमधे जाऊन लहान, मोठे फोटो ही काढून घेतले होते. एक क्लोजअप आणि दुसरा संपूर्ण उभा. मान ताठ धरून तिरकस उभे राहून काढून घेतलेले ते कृष्ण धवल फोटो आजही आमच्या संग्रही आहेत. क्लोजअप फोटोतून आपल्याकडेच पाहत `मी हे मिळवलं` असं अभिमानाने सांगणारे ते डोळे मला आठवतात. ते फोटो बाहेर काढून पाहिले की त्यातील चेह-यावरच्या स्मितहास्यातून दिसणारे यश मला आणि बाबांना अजूनही सुखावतं.
त्यावेळी `पदवी` म्हणजे काय हे समजण्याइतकी मी मोठी झाले नव्हते. पण आपल्या बाबांना मिळालेलं काहीतरी बक्षिस आहे हे नक्की ठाऊक झालं होतं. त्यांच्या गळ्यातला तो टाय साहेबी वाटायचा वाटायचा. पांढ-या पट्ट्या असलेला काळा डगला का घातला आहे तेच कळायचं नाही तेव्हा. पण ती हातात घेतलेली कागदाची गुंडाळी खूप आवडायची. मला समजायला लागल्यावर गोंड्याच्या काळ्या टोपीबद्दल बाबांना विचारलं. पण म्हणे त्या वेळी त्या स्ट्युडिओत तशी टोपी नव्हती, म्हणून बिन टोपीचाच फोटो काढला. मला मात्र त्या कमतरतेमुळे तश्या टोपीचं कायमच आकर्षण लागून राहिलं.
तो फोटो आणि ते पदवीचं सर्टीफिकेट मग मोठ्या लाकडी फ्रेम मधे बसवून घेतलं. कित्येक दिवस, नव्हे वर्ष, काचेच्या मागे अडकवलेला फ्रेम मधला फोटो मोठ्या दिमाखात घरातल्या भिंतीवर झळकत होता. त्या शेजारीच ते इंग्रजी अक्षरातले पदवीचे सर्टीफिकेट ही होते.
खरच खूप ग्रेट अचिव्हमेंट होती ती. त्यासाठी हा देखावा उचितच होता.
माझे बाबा कोकणातले. वडिल भटपण करीत. मोठे कुटुंब. आर्थिक चणचण नेहमीचीच. घरच्या गरीबीमुळे मॅट्रिक झाल्यावर पुढील शिक्षणाचा विचार करणेही शक्य नव्हते. शहरात येऊन स्वत:च्या आणि आपल्या भावंडांच्या चरितार्थासाठी आधी नोकरी मिळवणे अपरिहार्य होते. सरकारी नोकरीत चिकटल्यानंतर लग्न झाले. माझ्या जन्मानंतर नोकरीत बढती मिळवण्याच्या उद्देशामुळे पदवीधर होणे गऱजेचे होते. म्हणून नाईट कॉलेज जॉईन केले. दिवसभर ऑफिसच काम. मग उशीरा संध्याकाळी तिथूनच परस्पर कॉलेजला जायचं, लेक्चर्स अटेंड करायची. घरी यायला अर्थात रात्र व्हायची. मी तर झोपून गेलेले असायची. आई ही नोकरी करत होती तेव्हा. तिलाही लवकर उठून घरचं सर्व काम करून ट्रेनने चर्चगेटला कामावर जायला लागायचं. बाबा येऊन जेऊन झोपत असत. दुस-या दिवशी पुन्हा तेच रूटिन. परिक्षेच्या आधी महिनाभर सुट्टी घेऊन अभ्यास करायचा आणि परीक्षाला बसायचं. असं करून प्रत्येक वर्षी पास होतच पदवी मिळवली तिही वयाच्या तिशी पस्तीशीत. त्याच पदवीचे ते सर्टीफिकेट. त्या कष्टाची आणि त्याच्या फलिताची आठवण करून देणारे. आणि पुन्हा काही तरी धेय्य, नविन उद्दिष्ट देणारे. उमेद वाढवणारे. मनाला उचल देणारे.
अधून मधून आणि विशेष करून दिवाळीला त्या फ्रेम्स खाली काढून साफसफाई होत असे आणि पुन्हा भिंतीवर त्याच दिमाखात त्या झळकत असत. बाबांनी पुढे पदव्युत्तर शिक्षण चालू ठेवले. कायद्यांचा अभ्यास करून`लॉ` ची पदवी मिळवली. पण तेव्हा मात्र तसे फोटो काढले नाहीत.
काही वर्षानी घराला जेव्हा रंगरंगोटी केली तेव्हा जुनं बरेचस सामान देऊन टाकण्यात आलं आणि नविन आणलं गेलं. घरात नविन गोदरेजच कपाट आणलं. ब्लॅक अन व्हाईट टिव्हीला दोन दार असलेलं लाकडी कॅबिनेट आणलं. सोफ्यासारख्या खूर्च्या आणल्या. त्यावर मऊ उश्या आणल्या. त्याच बरोबर खिडक्यांना रंगित मॅचिंग पडदे, जमिनीवर चमकदार कारपेट वगैरे बरेच बदल केले गेले. घरातील बाहेरच्या खोलीच्या मधोमध टिपॉय, त्यावरचा नक्षी भरलेला टेबल क्लॉथ, त्यावर काचेचा फ्लॉवरपॉट, त्यात अगदी खरे वाटतील अशी फुलं ठेवल्यावर तर ते घर कसे मॉडर्न दिसायला लागले. यावेळी त्या फ्रेम्स म्हणजे काळ्या गाऊन मधल्या त्या फोटोची फ्रेम आणि डिग्री सर्टीफिकेटची फ्रेम अश्या दोन्ही फ्रेम्स तिथे नव्हत्या. कारण आधीच त्या भिंतीवरून उतरवण्यात आल्या होत्या.
आईने त्या फ्रेम्स कागदात व्यवस्थित गूंडाळून कपाटावरच्या मोठ्या बॅगेत नीट ठेऊन दिल्या होत्या. बाबांना बरेच दिवस हे लक्षात आले नाही. कारण सामान अजून लागायचे होते. आवरासावरीची काम चालू होती. रोज दिसणारे नवनविन बदल कमी होऊन बंद झाले. घराची लावणी पूर्ण झाल्यावर बाबांना लक्षात आले की तो फोटो आणि ते सर्टिफिकेट जागेवर दिसत नाही आहे. लगेच विचारणी झाली त्याबद्दल. "त्या फ्रेम्स वरती ठेऊन दिल्या" म्हटल्यावर त्यांच्या रागाचा पारा इतका चढला की काय विचारून नका. कधी अबोला तर कधी धूसफूस. आदळआपट तर अनेकदा.
"तूला ना काही किंमतच नाही माझी" अस आईला ऐकवल गेलं. बाबांची नाराजी, रागाचा उद्रेक पाहूनही आई त्या जुन्या फ्रेम्स पुन्हा भिंतीवर लावायला तयार दिसत नव्हती. नवीन दिसणा-या घरात त्या जुन्या फ्रेम्स शोभत नव्हत्या. त्या पदवीची, बाबांची, त्यांच्या कष्टांची आणि त्या यशाची तिला किंमत नव्हती असे अजिबात नाही. कारण त्या यशाची तिही अर्धी भागीदारीण होती. तिनेच सर्व घर एकटीने सांभाळलं आणि तिच्या सहाकार्याशिवाय पदवी पदरात पडण अवघड नव्हे तर अशक्यही होतं.पण आता नुसत्या एका पदवीचे कौतुक करण्याचे दिवस राहिले नव्हते. बरेच जण पदवीधर होत होते आणि बाबांनीही पुढील पदवी मिळवली होती. घराच्या दारावरच्या पाटीवर बाबांच्या नावाखालीच `बी.ए., एल. एल. बी.` ह्या पदव्या अजूनही झळकत होत्या. घरातल्यांना तसेच बाहेरच्यांना घरात यायच्या आधीपासूनच त्याची जाणिव/माहिती दिली जात होती. मनात त्याचा अभिमानही होता. पण तोच आता घराच्या भिंतीवर दर्शवण्याची आवश्यकता नव्हता असं तिचं मत होतं तेव्हा.
दोघेही आपापल्या बाजून बरोबर!
यात विजयी कोण ठरले हे सांगायल हवं का?
काही दिवसांनी रागारागातच ते सर्टिफिकेट ठेवलं गेलं कुठल्याश्या फाईलला आणि मोठा फोटो ठेवला गेला कुठल्यातरी छोट्या अल्बमच्या शेवटच्या पानावर,पुठ्ठ्याचा आधी. आणि त्या जुन्या फ्रेम्स काचेसकट गेल्या डबाबाटलीवाल्याकडे. त्याही ते एक पैसा त्याच्याकडून न घेता! तो फोटो, ते पदवी सर्टिफिकेट यांना भिंतीवरची जागा जरी सोडावी लागली असली तरी आमच्या सर्वांच्या मनात मात्र त्यांनी कायमच घर केलेले आहे.

Urmee, ghait aahe. Udyach tourvar jaatey pan aalyavar savister lihin. faar bharbhar me 5chhi bhaag vachalet. Dolyat pani aale. mazya anek aathavani jagya zalyat. Boluch ga. Tu samarasun lihile aahes mala khoop aawadale.
उत्तर द्याहटवा