श्री गणेश चतुर्थी आता आठ-दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. उत्सवाचे वारे कित्येक दिवस आधिच वाहू लागले आहेत. आषाढच्या सरींत आणि श्रावणाच्या शिडकाव्यात चिंब होऊन हिरवीगच्च झालेली सर्व सृष्टी श्री गणेशाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहते आहे. तिथेच पिवळ्या, पांढ-या रानफुलांनी जणू फेर धरला आहे. विविध रंगी तेरडा माती मातीच्या कणातून तरारून आला आहे.
सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा पिढ्यानपिढ्या जोपासण्यात आलेल्या कोकणातील प्रत्येक देवघरची रंगरंगोटी आता संपली आहे. गणपतीच्या आसनाच्या मागच्या भिंतीवर निसर्गचित्रे, देवांची चित्रे रंगवून झाली आहेत. गणेशमंचाला आणि त्यावरील माटी/ माटवीला अधिकच आकर्षक करणा-या वस्तू गोळा करण्यासाठी लोकांची धावपळ आता मंदावली असली तरी मोदक, करंज्या, लाडू, शंकरपाळ्यांसारखे स्वादिष्ट खाद्यपदार्थ करण्यासाठी लागणा-या साहित्याची जमवाजमव वेगात सुरू झाली आहे. पूजेसाठी नारळ, सुपा-या झाडावरून केव्हाच्या उतरवून घेतल्या आहेत. समया, निरांजन व पूजेची इतत्र उपकरणी घासून पूसून लख्ख झाली आहेत. कोकणातील वा-याची बारीकशी झुळुक ही गणेश चतुर्थीचे महत्त्व गाते आहे.
सर्वच ठिकाणी त्या लंबोदर, गजवदन, वक्रतुंडाला अधिकाधिक सुंदर रुपडे देणात सर्व मूर्तीकार इतके गुंतले आहेत की त्यांना क्षणाची ही उसंत उरलेली नाही.
शहरामधेही ब-याचश्या हिंदू घराघरातून ही साफसफाई, पूजा साहित्याची खरेदी अशी सुरवात झाली आहे. ठेवणीतल्या वस्तू बाहेर आल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गल्ली बोळात, भर रस्त्यावर मंडप उभारले गेले असून पडद्याआड सुंदरसा देखावा तयार होत आहे. संध्याकाळच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांची, स्पर्धांची आखणी, रूपरेषा कागदांवर तरी तयार होऊ लागली आहे. लहान मोठा बाजार नानाविध वस्तूंनी भरून गेला आहे. तिथे पूजा साहित्य, आरत्यांची पुस्तके, टाळ, झांजा याच बरोबर सुशिभिकरणाच्या वस्तूंची लयलूट आहे. जनमानसांचे खिसे बघता बघता रिकामे होत असले तरी त्यांची मने मात्र भक्तिभावाने उतू जात आहेत. भरभरून उत्साहाने श्री गणरायाच्या आगत स्वागताची तयारी जोरदार सुरू झाली आहे.
या सणाची तयारीत आम्ही ही मागे राहिलेलो नाही. दोन चार दिवसाआधी आमच्या घरची साफसफाई संपली आणि श्री गणेशाची आरास कशी करायची यावर विचार सुरू झाला. विविध पर्याय डोळ्यासमोर आले आणि त्यातला एक आकारास आला. श्री विनायकासाठी यावर्षी कमलाकृती आसन करायचे ठरवले.
त्यासाठी थोडीफार खरेदी करायला लागणार होती. मोठ्या दुकानात एकच चक्कर मारून काम फत्ते झाले.
सर्वात आधी घेतली लाल रंगाची दोन्ही कडेला बारीकशी तार असलेली चार इंच रूंद चकमकित रिबिन. डिसेंबरमधे येणा-या नाताळ सणानिमित्त इथे अमेरिकेतील दुकानात आतापासूनच विविध वस्तूंची मांडामांड झाली आहे. त्यातच ही रूंद रिबिन विक्रिसाठी ठेवलेली मिळाली. तिथूनच सहा इंच व्यासाचे लाल रंगाचे प्लास्टिकचे भांडे किंवा बाऊल आणि कमळाच्या पानासाठी चकाकणारा हिरवा कागद ही घेतला. याशिवाय घरी स्टेपलर, कात्री, लाल दोरा वगैरे साहित्य होतेच.
सर्व प्रथम लाल रिबिनिचे पाच इंच लांब १८ तुकडे कापून घेतले. प्रत्येक तुकड्याच्या एका बाजूला चुण्या घालून दोन्ही बाजूच्या तारा एकत्र जुळवून लाल दो-याने बांधून टाकल्या. यामुळे त्या तुकड्याला पाकळीचा आकार आला. अश्या १८ पाकळ्या तयार केल्या. त्यापैकी ६ पाकळ्या एकमेकांना स्टेपलर पिनेने जोडल्या व त्या पाकळ्यांचे फुल तयार झाले. प्रत्येकी ६ पाकळ्यांचे चकतीसारखे गोलाकार एक फुल; अशी ३ फुले तयार झाली.
एक फुल लाल प्लास्टिक भांड्याच्या आतमधे, दुसरे बाहेरच्या बाजूला स्टेपलर पिनेने टोचून टाकले. भांड्याच्या आतल्या पाकळ्या थोड्या आत झुकलेल्या आणि भांड्याच्या बाहेरच्या पाकळ्या जराश्या बाहेर वळणा-या ठेवल्या. ह्या लाल रिबिनीला दोन्ही कडेला बारीकशी तार असल्यामुळे प्रत्येक पाकळी लूळी न पडता हव्या त्या स्थितीत राहू शकली. उरलेले तिसरे फुल मात्र लाल भांड्याच्या खाली सपाट ठेवले व पाकळीच्या केवळ टोकाकडच्या तारा जराश्या वाकवून गोलाकार आकार दिला. अश्या प्रकारे तीन पदरी कमळ तयार झाले ते असे...
हवे तर त्या पानावर पेनाने शिरांसारख्या रेषाही रेखाटता आल्या असत्या. पण मी कागदाच्या घड्या घालून पानांच्या शिरा उमटवल्या. ती दोन्ही पाने लाल कमळाखाली ठेवल्यावर ते कमळ छान दिसायला लागले.
मग उत्साह अधिकच वाढला. भिंतीवरून एक निळसर चकाकणा-या कापडाचा पडदा खाली जमिनीपर्यंत सोडला. जमिनीवर टेबल ठेवून ते त्या निळ्या पडद्याआड केले. टेबलावरील चकमकीत पानांवर लाल कमळ ठेवले. बाजूने वर डोकावणारी कळी जोडली. टेबलाशेजारी दिवा लावून कमळावर प्रकाश केंद्रित केल्यावर ती सजावट अधिकच मनमोहक दिसायला लागली.
आमच्या घरी एकरंगी साधीशी परंतु मनोहारी गणेश मूर्ती आहे. ती मूर्ती एरवी शोकेसमधे सुरक्षित ठेवलेली असते. दरवर्षी भाद्रपदातल्या श्री गणेश चतुर्थी सणानिमित्त आम्ही ती मूर्ती बाहेर काढतो. दृश्यस्वरूपात चौरंग/ टेबलावर ती मूर्ती दिसत असली तरी त्या समोर ठेवलेल्या सुपारीची मनोभावे पूजा करून तिचे विसर्जन करतो. एकतर शाडूची बिना भंगलेली सुबकशी मूर्ती आमच्या इथे मिळत नाही. दुसरे म्हणजे तिचे जवळच्या नदीत विसर्जन करताना नको घ्यायला कुणाची परवानगी किंवा नको शहरी नियमांचे उल्लंघन!
सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा पिढ्यानपिढ्या जोपासण्यात आलेल्या कोकणातील प्रत्येक देवघरची रंगरंगोटी आता संपली आहे. गणपतीच्या आसनाच्या मागच्या भिंतीवर निसर्गचित्रे, देवांची चित्रे रंगवून झाली आहेत. गणेशमंचाला आणि त्यावरील माटी/ माटवीला अधिकच आकर्षक करणा-या वस्तू गोळा करण्यासाठी लोकांची धावपळ आता मंदावली असली तरी मोदक, करंज्या, लाडू, शंकरपाळ्यांसारखे स्वादिष्ट खाद्यपदार्थ करण्यासाठी लागणा-या साहित्याची जमवाजमव वेगात सुरू झाली आहे. पूजेसाठी नारळ, सुपा-या झाडावरून केव्हाच्या उतरवून घेतल्या आहेत. समया, निरांजन व पूजेची इतत्र उपकरणी घासून पूसून लख्ख झाली आहेत. कोकणातील वा-याची बारीकशी झुळुक ही गणेश चतुर्थीचे महत्त्व गाते आहे.
सर्वच ठिकाणी त्या लंबोदर, गजवदन, वक्रतुंडाला अधिकाधिक सुंदर रुपडे देणात सर्व मूर्तीकार इतके गुंतले आहेत की त्यांना क्षणाची ही उसंत उरलेली नाही.
शहरामधेही ब-याचश्या हिंदू घराघरातून ही साफसफाई, पूजा साहित्याची खरेदी अशी सुरवात झाली आहे. ठेवणीतल्या वस्तू बाहेर आल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गल्ली बोळात, भर रस्त्यावर मंडप उभारले गेले असून पडद्याआड सुंदरसा देखावा तयार होत आहे. संध्याकाळच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांची, स्पर्धांची आखणी, रूपरेषा कागदांवर तरी तयार होऊ लागली आहे. लहान मोठा बाजार नानाविध वस्तूंनी भरून गेला आहे. तिथे पूजा साहित्य, आरत्यांची पुस्तके, टाळ, झांजा याच बरोबर सुशिभिकरणाच्या वस्तूंची लयलूट आहे. जनमानसांचे खिसे बघता बघता रिकामे होत असले तरी त्यांची मने मात्र भक्तिभावाने उतू जात आहेत. भरभरून उत्साहाने श्री गणरायाच्या आगत स्वागताची तयारी जोरदार सुरू झाली आहे.
या सणाची तयारीत आम्ही ही मागे राहिलेलो नाही. दोन चार दिवसाआधी आमच्या घरची साफसफाई संपली आणि श्री गणेशाची आरास कशी करायची यावर विचार सुरू झाला. विविध पर्याय डोळ्यासमोर आले आणि त्यातला एक आकारास आला. श्री विनायकासाठी यावर्षी कमलाकृती आसन करायचे ठरवले.
त्यासाठी थोडीफार खरेदी करायला लागणार होती. मोठ्या दुकानात एकच चक्कर मारून काम फत्ते झाले.
अजून रिबीन कापून तीन चार पाकळ्यांची कमळाची कळी ही तयार केली. ती जाडसर तारेला बांधून तारेवर हिरवा कागद चिकटवून टाकला.
चकमकित हिरव्या कागदाचे कमळाच्या पानाप्रमाणे दोन गोल कापले.मग उत्साह अधिकच वाढला. भिंतीवरून एक निळसर चकाकणा-या कापडाचा पडदा खाली जमिनीपर्यंत सोडला. जमिनीवर टेबल ठेवून ते त्या निळ्या पडद्याआड केले. टेबलावरील चकमकीत पानांवर लाल कमळ ठेवले. बाजूने वर डोकावणारी कळी जोडली. टेबलाशेजारी दिवा लावून कमळावर प्रकाश केंद्रित केल्यावर ती सजावट अधिकच मनमोहक दिसायला लागली.
आमच्या घरी एकरंगी साधीशी परंतु मनोहारी गणेश मूर्ती आहे. ती मूर्ती एरवी शोकेसमधे सुरक्षित ठेवलेली असते. दरवर्षी भाद्रपदातल्या श्री गणेश चतुर्थी सणानिमित्त आम्ही ती मूर्ती बाहेर काढतो. दृश्यस्वरूपात चौरंग/ टेबलावर ती मूर्ती दिसत असली तरी त्या समोर ठेवलेल्या सुपारीची मनोभावे पूजा करून तिचे विसर्जन करतो. एकतर शाडूची बिना भंगलेली सुबकशी मूर्ती आमच्या इथे मिळत नाही. दुसरे म्हणजे तिचे जवळच्या नदीत विसर्जन करताना नको घ्यायला कुणाची परवानगी किंवा नको शहरी नियमांचे उल्लंघन!
असो. तर असे हस्तकलानिर्मित कमळ तयार झाल्यावर त्यात ‘ती मंगलमूर्ती कशी दिसेल?‘ अशी लागलेली उत्सुकता आम्ही रोखून ठेवू शकलो नाही. लागलीच आम्ही ती शोकेसमधली मूर्ती बाहेर काढून त्या कमळावर ठेवली. आत्ता त्या कमळात खरं तर जिवंतपणा जाणवायला लागला होता.
अश्या प्रकारे कमल धराय, कमल धारणाय, कमल नेत्राय, कमलाकर, कमलासनाय कमलेश आमच्याकडून पूजा, आरती आणि नैवेद्य रूपी पूजा मान्य करून घेण्यास सज्ज झाले आहेत असे आम्हाला वाटले.

तूम्ही तूमच्या घरी सुखकर्ता दु:खहर्ता विघ्न विनाशकाच्या आगमानासाठी तयारी केली आहे का? ती कशी?
सही यार मीनल..... मस्तच !! रंग एकदम चटकदार घेतल्यामुळे खूप छान दिसतंय !!
उत्तर द्याहटवा