उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

२७ डिसेंबर, २०११

कॅरोलिना अनोल

करेबिअन  बेट तसेच अमेरिकेच्या आग्नेय भागात Carolina anole (Anolis carolinensis) नावाच्या सरड्यांसारख्या पाली पहायला मिळतात. यातील काहींना Green anole, American anole and Red-throated anole असेही म्हणतात.  यांच्या रंग बदलणा-या गुणांमुळे यांना ब-याचदा अमेरिकन सरडे म्हणत असले तरीही या पालीच.
आंतर जालावर याविषयी अधिक माहिती मिळाली -
Kingdom: Animalia
Phylum: Chordata
Class: Reptilia
Order: Squamata
Family: Polychrotidae
Genus: Anolis
    साप जसा कात टाकतो त्या प्रमाणे या पाली आपल्या कातडीवरचा पापुद्रा  दोन चार महिन्यांनी काढून टाकतात.  इतर पालींप्रमाणे  संकट समयी अथवा भक्ष्य ठरल्यास स्वरक्षणार्थ आपली शेपटीचा  टोकाचा भाग सोडून टाकतात व तिथे नविन शेपटी येते. पाल मादींना आकर्षित करण्यासाठी नर पाल आपल्या गळ्याखालील भाग(dewlap) पंख्यासारखा फुलवतो. Brown Anoleची टिपलेली ही  छायाचित्रे-


२ टिप्पण्या:

  1. धोक्याच्या शंकेने शेपटी टाकून दिली असे समजल्यामुळे दोन शेपट्या फुटलेली पालही मी पाहिलेली आहे.

    मात्र पाल शेपटी टाकून पळते, तो नजारा पाहण्यासारखा असतो. सोडून दिल्यावरही शेपटी वेगळ्याने वळवळत राहते, आणि पाल तेवढ्यात पळून जाऊन जीव वाचवते. हे सारे कसे साधते ते जैववैज्ञानिकच सांगू जाणे! किंवा त्या पाली!!

    तुमचे फोटो सुरेख आलेले आहेत. विशेषतः तो गळ्यातला पिसारा. आवडला.

    उत्तर द्याहटवा
  2. हा फोटो माझ्या यजमानांनी घेतला आहे. पण ‘हा फोटो असा घे‘ ही सुचवणी मात्र माझी.

    उत्तर द्याहटवा